विदर्भातील आमदाराचा १४० एकर जमिनीवर डोळा

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अन्यत्र जाणार का, अशी भीती जनतेत वाढत आहे. या महाविद्यालयासाठी मल कॅन्स्ट्रक्षण कंपनीने वेळा येथील त्यांच्या मालकीच्या १८२ एकर जागेपैकी ४० एकर जागा या वैद्यकीय महाविद्यालयास दान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण आरोप झाल्याने ती जागा दान देण्याचा निर्णय परत घेत असल्याचे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

 

संघर्ष समिती व आमदार कुणावार विरोधकांनी दान हे संशयी असल्याचा आरोप केला. यात कंपनी व आमदारांचा स्वार्थ असल्याचा आरोप पण केला. मेडिकल कॉलेज झाल्यानंतर उर्वरित १४० एकर जागेवर चांगला विकास होणार. त्याचा लाभ कुणाला होणार हे लपून नाही.

 

यावर प्रथमच बोलतांना समीर कुणावार म्हणाले की अत्यंत निराधार आरोप आहेत. उर्वरित जागेवर फायदा घेण्यासाठी मी व कंपनी यात काही करार झाला असल्यास तसे पुरावे सादर करावे. अन्यथा मी आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार. दुसरी बाब म्हणजे या जागेस जे विरोध करीत आहे त्यांनी दुसरी निकष्यात बसणारी जागा सरकारला सुचवावी. तिसरी बाब म्हणजे या विरोधक मंडळींनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना चुकीची माहिती पुरविली. वेळा खूप दूर असून हिंगणघाटकरांना ती सोयीची जागा ठरणार नसल्याचे सांगितले. हे चुकीचे आहे. कारण वेळा येथेच अशी सलग जागा उपलब्ध असून अन्यत्र जागा नाही. उपजिल्हा रुग्णालयात केवळ ९ एकर जागा आहे. त्यावर कॉलेज शक्य नाही. खोटा प्रचार करीत विरोधक हा मुद्दा राजकीय करीत आहे. विधानसभा निवडणुकी पर्यंत ते राजकारण करणार, अशी भूमिका आमदार समीर कुणावार यांनी लोकसत्ता सोबत बोलतांना प्रथमच मंडळी. मी आरोप करणाऱ्या कथित नेत्यांवर कायदेशीर कारवाई करणारच, असा निर्धार पण त्यांनी व्यक्त केला.

 

आणखी वाचा-वारकऱ्यांसाठी खुशखबर! आषाढी वारीनिमित्त धावणार विशेष रेल्‍वे गाड्या

 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अतुल वांदिले यांनी वेळा येथील जागेस जोरदार विरोध केला आहे. ते म्हणतात की खासगी जागा सोडून शासनाच्या जागेतच महाविद्यालय व्हावे. त्यांनी ( आमदार कुणावार ) याच जागेचा आग्रह केला यामागे स्वार्थ असल्याची जनतेची भावना आहे. ती मी मांडली. दुसरी बाब म्हणजे उपजिल्हा रुग्णालयात अन्य लोकांना जागा आरक्षित केली. तर ते आरक्षण सरकार काढू शकते. आणि १५ जुलैला होणाऱ्या आंदोलनापूर्वी मी सर्व खुलासा करणार, अशी ग्वाही अतुल वांदिले यांनी ऑनलाईन सोबत बोलतांना दिली. एकूणच हे प्रकरण वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.

About विश्व भारत

Check Also

राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड

महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार …

अनिल देशमुख यांच्यावर कोणी केला हल्ला? मोठा दावा

विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याच्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *