Breaking News

चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती कृती समितीने केला दारूबंदी रद्द करण्याचा निषेध

चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती कृती समितीने केला दारूबंदी रद्द करण्याचा निषेध

टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट

दारूबंदी लागू करा,व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करा….

चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती कृती समितीने केला दारूबंदी रद्द करण्याचा निषेध

चंद्रपूर :

येथील चंद्रपूर जिल्हा दारू मुक्ती कृती समिती चंद्रपूर तर्फे जिल्ह्यातील दारूबंदी राज्य शासनाने ठरविल्यानंतर गुरुदेव भक्तांनी त्याचा एकत्रितपणे येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निषेध नोंदविला यावेळी चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती कृती समितीचे जिल्हा प्रमुख व गुरुकुंज आश्रम मध्यवर्ती प्रतिनिधी विजय चिताडे,मध्यवर्तीती प्रतिनिधी अन्याजी ढवस,गुरुदेव सेवा मंडळचे देवराव बोबडे,गुरुदेव सेवाधिकारी धर्माजी खंगार, गुरुदेव सेवा मंडळ उपाध्यक्ष माया मांदाडे,महिला प्रतिनिधी प्राचार्य प्रज्ञा गंधेवार,वसंतराव धंदरे,अवघडे गुरुजी,अरविंद मडावी,पुरुषोत्तम सहारे, आनंदराव मांदाडे,रमेशराव ददगाल,विजय ठकरे,मंजुश्री कासंगोट्टूवार, आशा देऊळकर, शुभांगी दिकोंडवार,सुनीता भांडे,अनिता सिंग,साधना दुरडकर,मंगला सिडाम,सिमा मडावी,गीता गेडाम,नीता रामटेके,विभा मेश्राम,कल्पना गिरडकर, आदिवासी नेते धनराज कोवे ,यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना विजय चिताडे म्हणाले,चंद्रपुर जिल्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी आहे.जीवनभर त्यांनी मद्यप्राशन चा विरोध करीत व्यसनमुक्ती साठी जीवन दिले.हेच नाहीतर हि भूमी, व्यसनमुक्तीचे समर्थन करणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पादस्पर्शाने ही भूमी पावन झाली.त्या भूमीतील मातृशक्तीने क्रांतिभूमी चिमूर ते नागपूर विधानभवन पायपीट करीत दारूचा विरोध दर्शवित दारूबंदीची मागणी केली.दारूमूळे उध्वस्त होणारे संसार वाचवा.कपाळाचं कुंकु शाबूत ठेवा अशी मागणी करीत एल्गार पुकारला.आणि याची दखल घेत २०१५ ला दारूबंदी लागू झाली.याचे गुरुदेव भक्तांनी स्वागत केले.परंतु महाविकास आघाडी सरकारने एका कॅबिनेट मंत्र्याच्या अट्टहासापोटी दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला,ही बाब जिल्ह्यातील सर्व मातृशक्तीचा अपमान करणारी आहे.आम्ही या निर्णयाचा व पालकमंत्र्यांचा तीव्र निषेध करतो.दारुबंदीसह व्यसनमुक्ती धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी बोलतांना गुरुदेव सेवा मंडळच्या महिला प्रतिनिधी प्राचार्य प्रज्ञा गंधेवार म्हणाल्या,पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची ही खेळी आहे.अवैध दारू विकली जाते,२५ हजार पुरुष,४ हजार महिला व ३०० च्यावर बालकांवर गुन्हे दाखल झाले हे कारण पुढे करीत दारूबंदी उठविल्याची घोषणा केली.हेच नाहीतर त्यांनी महसूल बुडण्याचा विषय पण मांडला.मुळात हे कारण नसून प्रचलित दारुविक्रेत्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार होय.असे त्या म्हणाल्या.यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.महिलांचा सन्मान करा,दारूबंदी लागु करा…अशी घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.

गुरुदेवभक्तांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्या नां निवेदन सादर केले.यावेळी गुरुदेवभक्त माया मांदाडे,अन्याजी ढवस यांनी समयोचित मार्गदर्शन केले.

आंदोलनाचे प्रास्ताविक उषा मेश्राम यांनी तर संचालन व आभार कल्पना गिरडकर यांनी केले.आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदविला.

About विश्व भारत

Check Also

राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड

महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार …

अनिल देशमुख यांच्यावर कोणी केला हल्ला? मोठा दावा

विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याच्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *