Breaking News

महायुतीची ‘लाडकी बहीण’ तर काँग्रेसची ‘महालक्ष्मी’ योजना

महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. त्याला राज्यातील बहिणींचा लाभलेला उत्स्फुर्त प्रतिसाद चांगलाच चर्चेत आहे. शासकीय कार्यालयात महिला वर्गाच्या उसळलेल्या गर्दीने इतर कामे ठप्प पडल्याचे चित्र दिसून येते. आता राज्याच्या लाडकी बहीणपाठोपाठ काँग्रेसने महालक्ष्मी योजना पुरस्कृत केली आहे.

 

काँग्रेसने तयार केलेल्या न्यायपत्रात या महालक्ष्मी योजनेचा उल्लेख आहे. त्यात प्रत्येक महिलेला वार्षिक एक लाख रुपये मदत देण्याची तरतूद आहे. देशातील गृहिणींना महागाईने हैरान केले आहे. त्यांना दिलासा मिळाला पाहिजे. महालक्ष्मी योजना देशात लागू करून महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी महिला काँग्रेसने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच महिलांना ३३ टक्के आरक्षण आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी लागू करावे, राजकीय भागीदारी मिळावी, महिलांवरील अत्याचार थांबवावे व अन्य मागण्या चारुलता टोकस व जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष हेमलता मेघे यांनी केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेले हे निवेदन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना श्रीमती मेघे व महिला सहकाऱ्यांनी दिले.

About विश्व भारत

Check Also

केजरीवाल को लेकर उद्धव ठाकरे ने BJP पर साधा निशाना

केजरीवाल को लेकर उद्धव ठाकरे ने BJP पर साधा निशाना टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

नितीन गडकरी ने दी ठेकेदारों को वार्निंग

नितीन गडकरी ने दी ठेकेदारों को वार्निंग टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   गाजियाबाद ।केंद्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *