Breaking News

नागपुरातील सदरमधील सलून पार्लरमध्ये ‘सेक्स रॅकेट’

नागपुरातील सदरमध्ये सलून पार्लरमध्ये ‘सेक्स रॅकेट’

सलून अ‍ॅण्ड मसाज पार्लरच्या आड देहव्यवसाय करून घेणाऱ्या बिट्झ युनिसेक्स प्रोफेशनल सलून अ‍ॅण्ड मसाज पार्लरच्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या तावडीतून पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली. तसेच कारवाईत २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भावेश उदयसिंग गेडाम (रा. २९ रा. प्लॉट नंबर ५३, गोरेवाडा, गिट्टीखदान) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी सदर पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई केली.

 

माहितीनुसार, सदर पोलीस ठाणे हद्दीतील जे.पी हाईट, बैरामजी टाऊन, गोंडवाना चौक येथे ‘बिट्झ युनिसेक्स प्रोफेशनल सलून अ‍ॅण्ड मसाज पार्लर’ आहे. येथे मागील काही दिवसांपासून तरुणांची मोठी गर्दी दिसून येत होती. या सलूनमध्ये तरुणींकडून देहव्यवसाय करून घेतला जात होता. गेल्या आठवड्यात पार्लरमध्ये अल्पवयीन मुलींसुद्धा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे तेथे ग्राहकांची चांगलीच गर्दी देखील वाढू लागली होती. आरोपी भावेश गेडाम हा स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता तरुणींना पैशांचे आमिष दाखवत या व्यवसायात ओढत होता. त्यानंतर त्यांना ग्राहक तसेच जागा उपलब्ध करून देण्याचे काम करायचा.

 

पोलिसांना या सर्व प्रकाराची कुणकुण लागली. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी या पार्सरवर बनावट ग्राहक पाठवला. त्याने तरुणीची मागणी केली. भावेशने त्याला लगेच दोन तरुणींपैकी एकीची निवड करण्यास सांगितली. त्याने पाच हजार रुपये दिले. त्याने काही वेळातच दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी इशारा केला. पोलिसांनी लगेच छापा टाकला. यावेळी आरोपी भावेश हा तरुणींकडून देहव्यवसाय करून घेताना मिळून आला. कारवाईत पोलिसांनी दोन पीडित तरुणींची सुटका केली. तर आरोपीच्या ताब्यातून १ भ्रमणध्वनी, १० हजार रुपयांची रोकड, डीव्हीआर व ईतर साहित्य असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपी विरूद्ध कलम १४३(३) भान्यासं सहकलम ४, ५, ७ पिटा अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा केला आहे. आरोपीला जप्त मुद्देमालासह सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दोन्ही तरुणींचे आर्थिक शोषण

दोन्ही तरुणी त्याच्या पार्लरमध्ये काम मागण्यासाठी आल्या होत्या. त्याने सुरुवातील काम दिले आणि त्यांनी आंबटशौकीन ग्राहकांकडे गेल्यास अर्धेअर्धे पैसे देण्याची तयारी दर्शवली. देहव्यापार करण्यास तयारी न दर्शविल्यास काम सोडून जावे लागेल, अशी धमकी दिली. त्यामुळे दोन्ही तरुणींनी होकार दिला. मात्र, भावेश हा प्रत्येक ग्राहकांकडून ५ हजार रुपये घेत होता आणि तरुणींना केवळ एक हजार रुपये देऊन त्यांचे आर्थिक शोषण करीत होता.

About विश्व भारत

Check Also

गणेशोत्सव संपताच मटण-चिकनच्या दुकानांबाहेर गर्दी : रेटही वाढले

राज्यात सर्वत्र गणपती उत्सवाची धामधुम सुरू होती. राज्यात मांसाहार करणाऱ्या खवय्यांची चिकन आणि मटणाच्या दुकानात …

बनावटी और झूठे आंसुओं का पर्दाफाश : ‘कातिल’ पत्नी गिरफ्तार

बनावटी और झूठे आंसुओं का पर्दाफाश : ‘कातिल’ पत्नी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *