नागपुरातील वकील आर. एल. खापरे यांचे निधन
:मुंबई, नागपूर उच्च न्यायालयाचे प्रख्यात विधिज्ञ आणि बुलढाणा एज्युकेशन सोसायटीचे संचालक ऍडव्होकेट आर. एल. खापरे यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या, 24 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जातील. खापरे मूळचे बुलढाण्याचे आहेत. बुलढाण्याचे प्रसिद्ध वकील ऍड. लक्ष्मणराव खापरे यांचे ते सुपुत्र होते. नागपूरला निवासस्थानी पहाटेच्या समयी आर. एल. खापरे यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला. ते 66 वर्षांचे होते. बुलढाण्यातील ऍड. रामानंद कविमंडन यांचे ते आत्येभाऊ होते.
विश्वभारत News Website