कायदे,अटी,नियम,बंदी अस्तित्वात असूनही नायलॉन मांजाची खरेदी-विक्री दिसून येते ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.नायलॉन मांजाची विक्री होऊ नये म्हणून प्रशासन सज्ज असते व आहे.प्रशासन मांजाच्या दुकानावर छापे टाकते.तिथे कोठेही मांजा सापडत नाही किंवा दिसत नाही. नेमक्या मकरसंक्रांतीला नायलॉन मांजा कुठुन येतो,हा आताही सर्वांपुढे मोठा गंभीर प्रश्न आहे. प्रशासनाने ऑनलाईन खरेदी- विक्रीकडे करडी नजर ठेवण्याची नितांत गरज आहे. तेथुनच नायलॉन मांजावर ब्रेक लावता येईल.पोलिसांची सक्त कारवाई आणि निरअपराध लोकांचा जाणारा जीव किंवा दुर्घटना हे डोळ्यांनी दिसत असुन सुद्धा नायलॉन मांजा विक्रेता व खरेदीदारांना समज आलेला नाही ही दुर्दैवाची बाब आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाच्या विक्री व खरेदीवर बंदी आहे. तरीही नायलॉन मांजाची विक्री सर्रास सुरू असल्याचे अनेक भागांत दिसून येते.राज्यातील अनेक भागांत नायलॉन मांजाची आवक उत्तर प्रदेशच्या बरेली आणि गुजरातच्या वडोदरा येथून होत असल्याचे सांगितले जाते. नायलॉन मांजावर बंदी असुन सुद्धा विक्री सर्रास सुरू आहे याला आपणच रोखु शकतो. नायलॉन मांजा मानव आणि पशु-पक्षांसाठी जीवघेना व अत्यंत घातक आहे त्यामुळे नायलॉन मांजाचा “बहिष्कार” सर्वच स्तरातून होने अत्यंत गरजेचे आहे.कारण नायलॉन मांजाच्या विरोधात प्रशासनाने कंबर कसली आहे.त्याच धर्तीवर सर्वसामान्यांनी नायलॉन मांजाच्या विरोधात ऍक्शन मोडमध्ये येण्याची नितांत गरज आहे.राज्यातील अनेक भागांत नायलॉन मांजामुळे अंगावर शहारे येणाऱ्या घटना घडल्या आहेत आणि आताही घडतच आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे.माझ्या लेखणीच्या माध्यमातून आपणास विनंती आहे की कोणत्याही दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता “नायलॉन मांजाचा सर्वच स्तरातून बहिष्कार” होने अत्यंत आवश्यक आहे. याकरीता नागरिकांनीच प्रथम पाऊले उचलले पाहिजे तेव्हाच प्रशासनाला कारवाई करण्यास मोठी मदत नागरिकांकडून मिळेल असे मला वाटते. कारण नायलॉन मांजामुळे मानवी व पशुपक्षांच्या हजारो दुर्घटना दरवर्षी होत असतात आणि होत आहेत. एखाद्या विजेच्या ताराला जर पतंग अडकली तर विजेचे तार एकमेकांवर आदळतात व त्याचा स्पार्क होतो अशा वेळेस पतंग उडविणाऱ्याला कदाचित आपला प्राणसुध्दा गमवावा लागतो.पोलिस विभाग नायलॉन मांजाच्या बाबतीत सतर्कता बाळगुन लाखो रुपयांचा नायलॉन मांजा रोज जप्त करीत आहे.परंतु प्रश्न आहे की, मांजा येतो कोठुन याची प्रशासना मार्फत सहनिशा झाली पाहिजे असे मला वाटते. नायलॉन मांजावर सरकार व पोलीस विभाग यावर लक्ष ठेवुन आहे.तरी मांजा येतो कोठुन हा अत्यंत गंभीर चिंतेचा विषय आहे.यावर सरकारने गांभीर्याने लक्ष केंद्रित करून नायलॉन मांजा बाबतीत योग्य ते पाऊल उचलावे व नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सर्वतोपरी मदत करावी.जय हिंद.
बंदी असताना जिवघेणा नायलॉन मांजा बाजारात!
Advertisements
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website