Breaking News

भामरागडच्या प्रदर्शनात एकाच ठिकाणी 85 योजनांची माहिती

Advertisements

भामरागडच्या प्रदर्शनात एकाच ठिकाणी 85 योजनांची माहिती

Advertisements

टेकचंद्र सनोडिया शास्त्री:

Advertisements

9822560220

 

भामरागड । जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व सामाजिक न्याय विभाग यांच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत भामरागडच्या तहसील कार्यालयात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवरील मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव व तहसीलदार किशोर बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्धाटनप्रसंगी राऊत म्हणाले की, ‘शासकीय योजनांचा लाभ घेणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घेऊन त्यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. या प्रदर्शनामधून योजनांची थोडक्यात व सुस्पष्ट माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत असून त्याचा निश्चितच लाभ होईल. भामरागडसारख्या दुर्गम भागात अशा प्रकारे योजनांची माहिती पोहोचविणे हा जिल्हा माहिती कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम आहे. तसेच सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाच्या योजना शेवटच्या गाव व टोल्यांपर्यंत पोहोचवाव्यात,’ असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांनी सांगितले की, विविध शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणे ही नागरिकांसाठी मोठी संधी आहे. नागरिकांनी येथे प्रदर्शित योजनांची माहिती जाणून घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

तहसीलदार किशोर बागडे यांनी आपल्या मनोगतात भामरागडसारख्या दुर्गम भागात प्रथमच अशा प्रकारे योजनांची एकत्रित माहिती उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद करत त्यांनी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळानिहाय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून विजेत्यांना तहसील कार्यालयामार्फत पुरस्कार देण्यात येतील, अशी माहिती दिली

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल कॉलेज में MBBC की छात्रा की मौत से खलबली

मेडिकल कॉलेज में MBBC की छात्रा की मौत से खलबली   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

जानिए क्या वाकई सोशल मीडिया मैनेजर कमाते हैं लाखों रुपये? 

जानिए क्या वाकई सोशल मीडिया मैनेजर कमाते हैं लाखों रुपये? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *