ज्ञान,शक्ती,भक्ती,ऊर्जा व बुध्दिमत्तेचा अथांग सागर महाबली हनुमान
महाबली हनुमान सर्वांचेच संकट मोचन आहेत.हनुमान जन्मोत्सव दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येत असते.चैत्रशुध्द प्रतिपदेला गुढीपाडवा म्हणजेच हिंदू धर्माचे नवीन वर्ष, यानंतर चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामाचा जन्मोस्तव आणि चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केल्या जाते.भगवान प्रभु रामचंद्र विष्णुचे अवतार आहे तर महाबली हनुमान शंकरजींचा अवतार आहे.मुख्यत्वेकरून हनुमानाची पूजा रूईच्या फुलांनी केली जाते.भारतात हनुमान जन्मोत्सवाला पुजाअर्चना करून भव्य शोभायात्रा मोठ्या प्रमाणात काढण्यात येते.महाबली हनुमान हे राम भक्त होते. त्यांच्याजवळ ज्ञान आणि गुनांचा मोठा भंडार होता.त्याचप्रमाणे आपल्यावर जेव्हा-जेव्हा संकटे ओढावतात तेव्हा-तेव्हा आपण हनुमानाला साकडे घालत असतो म्हणूनच हनुमानाला संकटमोचन म्हटल्या जाते.हनुमानाने रावण दरबारी रामाचे दुत म्हणुन चोख भुमिका बजावली.रावण महाग्यानी व राजनितीज्ञ होता. परंतु अहंकारी असल्याने त्याने संपूर्ण मर्यादांचे उल्लंघन करून हनुमानाच्या शेपटीला आग लावली. परंतु याचा रावणावर विपरीत परिणाम झाला. कारण हनुमान रामाचे दुत म्हणून रावण दरबारी गेले होते.त्यामुळे हनुमानाने संपूर्ण लंका आगीच्या स्वाधीन करून लंका दहन केले आणि हनुमानाने आपल्या रामभक्तीचे, ज्ञानाचे व शक्ती प्रदर्शन केले. कारण रामाचे संकट म्हणजे स्वत:चे संकट असे हनुमान समजत आणि रामाच्या सुरक्षेसाठी असुरी शक्तीचा संहार करण्यास मदत केली व असुरी शक्तीचे पानीपत केले.महाबली हनुमान रामकथेतील मुख्य सुत्रधार समजल्या जाते.कारण राम, लक्षण,सिता यांच्या सोबत हनुमानाची भुमिका वटवृक्षाच्या सावली सारखी अफाट असल्याचे दिसून येते.तीच प्रतीकृती आज भारतात प्रत्येक मोहल्लात व गावात दिसून येते. मोहल्या-मोहल्यात व गावा-गावागातील जवळपासच्या पटांगणामध्ये हनुमानजींचे मंदिर दिसुन येते.कारण गावातील कठीण प्रसंग असो किंवा आपल्या स्वत: वरील कठीण प्रसंग असो किंवा आनंदाचा प्रसंग असो किंवा शुभ प्रसंग अशा प्रसंगी सर्वच महाबली हनुमान यांना साकडे घालुन आलेले संकट व येणारे संकट दुर करण्यासाठी आणि सुख:शांती निर्माण व्हावी यासाठी पुजाअर्चना केली जाते व साकडे घातले जाते.श्रीराम,लक्षण व सीता १४ वर्षे वनवासात असतांना बजरंबली हनुमान व त्यांच्या संपूर्ण वानरसेनेणे सुरक्षा कवच बनुन कार्य केले.कारण बजरंबली हनुमान अहोरात्र रामाचाच जप करायचे म्हणुनच रामाचा जय-जयकार करतांना रामासोबतच हनुमानाचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. याप्रमाणे “सीयाबल रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय” म्हणजेच जीथे राम तीथे आपल्याला बजरंग बली हनुमान दिसून येतो.सीतामाई यांनी ठरवीले की आपल्यासाठी रावणासारख्या बलाढ्य शत्रूशी वानरसेनेणे आणि हनुमान यांनी लढा दिला म्हणुन प्रत्येकाला काहीतरी द्यायचे म्हणून भेट वस्तू दील्या.यात हनुमानाचा पराक्रम पाहून त्या अती प्रसन्न होत्या.त्यामुळे हनुमानाला आगळीवेगळी मोठी वस्तु भेट देण्याचे ठरवीले.अशावेळी सीतामाईने आपल्या माहेरवरून मिळालेला नवरत्नाचा हार हनुमानाला आदरतीत्थाने भेट दिला. हनुमानाने हाराचा सन्मानाने स्वीकार केला.परंतु काही क्षणात हनुमानाने हारातील मनी दातांनी तोडायला सुरुवात केली. सीतेच्या तळपायाची आग मस्तकात गेली व हनुमानाला जाब विचारला तेव्हा हनुमान म्हणाले माई ज्या वस्तुत राम- सीता नाही त्याचा मला काय उपयोग?मी रामभक्त आहे असे म्हणत हनुमानाने आपली छाती फाडून आपल्या ह्रदयात राम-सीता आहे हे सीतामाईला दाखवून दिले.हनुमानाची भक्तीपाहुन प्रभुश्रीराम म्हणाले तुझे माझ्यावर एवढे ऋण आहे की मी तुला काय भेट देणार?यावर हनुमान म्हणाले हे प्रभुरामचंद्र द्यायचेच असेल तर एकच आशिर्वाद द्या,जीथे-जीथे तुमचे भजन-किर्तन सुरू असेल त्याचे श्रवण करण्याची मला संधी द्या.यावर श्रीराम तथास्तु म्हणाले! तेव्हापासून जिथे-जिथे रामनाम सुरू असते, रामाचा गजर होतो तिथे-तिथे महाबली हनुमानाचे नाव आदराने आपोआप येते.हनुमान जन्मोत्सवाला सर्वांनीच पवनपुत्र महाबली हनुमान यांना साकडे घालुन धरतीवरील बदलत्या हवामानामुळे वाढते प्रदुषण रोखण्यासाठी व प्राणवायूची मात्रा वाढवीण्यासाठी देशातील संपूर्ण हनुमान भक्तांनी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे गरजेचे आहे.कारण युद्धजन्य परिस्थिती व वाढते औद्योगिकीकरण यांमुळे सर्वत्र वातावरण प्रदूषित होत आहे.करीता वृक्ष लागवडीमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन व प्राणवायू मिळण्यास मोठी मदत होईल याचा फायदा मानव, पशुपक्षी व संपूर्ण जीव-जंतु यांना मोठ्या प्रमाणात मिळेल. यामुळे आपल्याला पृथ्वीतलावर हनुमान प्रगट झाल्याचे अवश्य दिसून येईल. सध्याच्या परिस्थितीत सोशल मीडियाच्या युगात आजचा युवा वर्ग बुध्दीने जरी हुशार आणि तर्बेज असला तरी शारीरिक दृष्ट्या परीपक्व नाही.महाबली हनुमान हे शक्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येकांनी हनुमानाचे नामस्मरण करून आपल्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे उर्जा निर्माण होवून शरीर सुदृढ रहाण्यास मोठी मदत होईल.हे पवणपुत्र हनुमान या कलियुगात भ्रष्टाचार एवढा शिगेला पोहोचला आहे की मुठभर राजकीय पुढाऱ्यांनी करोडो रुपयांची चल-अचल संपत्ती डांबुन ठेवल्याने भ्रष्टाचार, बेरोजगारी ,भुकमरी, कुपोषण, शैक्षणिक समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या व महागाईच्या रूपात असुरी शक्ती निर्माण झाली आहे.असुरी शक्तीमुळे आज सर्वसामान्यांचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे.या कठीण प्रसंगी हे पवनपुत्र हनुमंता वायुरूपात या धर्तीवर प्रगट हो आणि वाममार्गाने चल-अचल संपत्ती कमवीणाऱ्यां असुरांना त्यांची जागा दाखवून सर्वसामान्यांना महागाईच्या संकटातून बाहेर काढ.कारण मुठभर राजकीय पुढाऱ्यांच्या भ्रष्टाचाऱ्यांमुळे सर्वसामान्यांचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे.अशा संकट प्रसंगी हे संकटमोचन महाबली हनुमान आपण कोणत्याही रूपात पृथ्वीतलावर धावुन यावे अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो.आज हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून सर्वांनीच वृक्षारोपणाचा संकल्प करावा यामुळे एकाच दिवशी लाखोंच्या संख्येने वृक्षलागवड होईल.यामुळे गुरांना चारा, पशु-पक्षांना सावली व मानव-जीवजंतुंना शुद्ध हवा मिळण्यास मोठी मदत होईल.असे जर झाले तर प्रत्येक झाडात,पानात, फुलात व फळात आपल्याला महाबली हनुमानजींचे दर्शन अवश्य होईल.कारण महाबली हनुमान नेहमीच निसर्गाच्या सान्निध्यात रहायचे.जय हनुमान.
🚩एक मुखाने बोला;जय जय हनुमान🚩
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार.
(स्वतंत्र पत्रकार )
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
विश्वभारत News Website