Breaking News

कुली चित्रपटात अमिताभ ‘असे’ जिवंत झाले…CINEsanjana

Advertisements

शतकातून कुणी महात्मा गांधी, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर अशा महान व्यक्ती एकदाच जन्माला येतात आणि ते अनेकांचा श्वास, जगणं, प्रेरणा बनून जातात. भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन [amitabh bachhan] यांच्याबाबतही हेच घडले होते. ‘कुली’ चित्रपट पडद्यावर येऊन ३७ वर्षे झाली आणि तितकीच वर्षे अमिताभ यांच्या पुनर्जन्मालाही झाली.
हमारी तारीफ जरा लंबी है… बचपन से सर पे है अल्ला का हाथ और अल्लाहरखा अपने साथ बाजू पे ७८६ का है बिल्ला… २० नंबर की बिडी पिता हूँ…काम करता हूँ कुली का और नाम है इक्बाल… ‘कुली’मधील हा डायलॉग. अमिताभ स्क्रीनवर आला की लोकं अख्खे चित्रपटगृह डोक्यावर घेतात… शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडतो. आजही इतक्या वर्षांनी ‘कुली’ सुपरडुपरहिट आहे. त्याचे कारण अमिताभचा तगडा अभिनय तर आहेच. दुसरे म्हणजे चित्रिकरणादरम्यान झालेल्या अपघातातून मिळालेला दुसरा जन्म…होय त्या घटनेला दुसरा जन्मच म्हणता येईल.
घटना अशी…
२६ जुलै १९८२ रोजी अमिताभ ‘कुली’साठी बंगलोर युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये छायाचित्रण करत होते. चित्रपटात बरेच स्टंट्स होते. अमिताभ ‘डमी’ (आपल्यासारखा दिसणारा अन्य एक कलाकाऱ जीवघेणे दृश्यासाठी हा प्रयोग केला जातो.) वापरत नव्हते. अमिताभ उंचावरून टेबलवर आणि तिथून खाली पडतात, असे ते दृश्य होते. मात्र, घात झाला. सहकारी कलाकार पुनित इस्सार यांनी मारलेला ठोसा आणि टेबलावर पडताना चुकलेला अंदाज यामुळे अमिताभ गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईत ब्रीच कँडीत हलवण्यात आले. गुंतागुंतीच्या काही शस्त्रक्रिया पार पडल्या. देशात खळबळ उडाली. ठिकठिकाणी लोकांनी होमहवन, प्रार्थना सुरू केली. अमिताभ यांचे मित्र आणि काँग्रेस नेते राजीव गांधी यांनी आपला अमेरिकेचा दौरा रद्द केला. ते स्वत: रुग्णालयात हजर होते.
अमिताभ मृत्यूची गाठभेट घेऊन, त्याला निरोप देऊन परत आले. त्यांनी जानेवारी १९८३ मध्ये पुन्हा छायाचित्रण सुरू केले. चित्रपट पूर्ण केला आणि २ डिसेंबर १९८३ रोजी पडद्यावर आला, जो ब्लॉकबस्टर ठरला. १९८३ पर्यंत १०० कोटीपेक्षा अधिकचा धंदा करणारे १३ चित्रपट प्रदर्शित झाले होते, त्यातील नऊ अमिताभ यांचे होते. ‘कुली’ने तर कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले.
असे सांगण्यात येते की, ‘कुली’च्या मूळ पटकथेत (ओरिजनल स्क्रिप्ट) खलनायक कादर खान हे अमिताभ यांच्यावर गोळी झाडून त्यांना ठार करतो, असे दृश्य होते; पण प्रत्यक्ष आयुष्यात मृत्यूला चकवा देऊन आलेल्या अमिताभ बच्चन यांच्यामुळे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी त्यात बदल केला आणि अमिताभ यांचे त्यांना (अर्थांत त्यांचे पात्र) जिवंत दाखवण्यात आले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

दिल्ली में आज नहीं हो पाएंगे मेयर चुनाव? AAP ने कहा- पुरानी परंपरा तोड़ना चाहते हैं उपराज्यपाल

दिल्ली में आज नहीं हो पाएंगे मेयर चुनाव? AAP ने कहा- पुरानी परंपरा तोड़ना चाहते …

5 जिल्हाधिकऱ्यांची ‘ईडी’कडून चौकशी

पाच जिल्हाधिकाऱ्यांची सक्तवसुली संचालनालयापुढे (ईडी) चौकशी झाली. अवैध वाळू उपसा प्रकरणात चौकशी झाली आहे. यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *