नवी दिल्ली : चीनी कंपन्यांना भारतातल्या महामार्ग बांधकामांमध्ये (हायवे प्रोजेक्ट्स) सहभागी होता येणार नाही, असं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी
सांगितले आहे. कोणतीही चीनी कंपनी हायवे प्रोजेक्ट्सच्या कंत्राटासाठी अर्ज करता येणार नाही. चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनी कंपन्यांनी एखाद्या भारतीय किंवा इतर देशांच्या कंपनीसोबत जॉईंट व्हेन्चर करून अर्ज केला तरी देखील त्यांना परवानगी दिली जाणार नाही. चीनी गुंतवणूकदारांना भारतात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसोबत इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीपासून रोखण्यात येईल, असेही गडकरी म्हणाले. चीनसोबत सीमेवर तणाव वाढल्यानंतर भारताने टिकटॉकसह ५९ चिनी ऍप्सवर बंदी घातली. भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडत्व, भारताची सुरक्षा तसंच राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेसाठी धोका असल्यामुळे या ऍप्सवर बंदी घालत असल्याचं सरकारने सांगितले.
Check Also
नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला
राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!
‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …