लखनौ : मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे आज सकाळी मेदांता रुग्णालयात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री तसेच त्यांचे पुत्र आशुतोष टंडन ट्वीट करून माहिती दिली.
लालजी टंडन यांच्यावर मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्येमुळे सुमारे दीड महिन्यांपासून मेदांता रुग्णालयात 11 जून रोजीपासून उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास आणि तापामुळे रुग्णालयात दाखल केले होते.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यावर टंडन यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे याआधीच मध्य प्रदेशचा कार्यभार सोपविण्यात आला होता. मूळचे उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले टंडन अनेक वेळा राज्यातील भाजप सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. ते दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. वाजपेयी यांच्या निधनानंतर लखनौ ते 15 व्या लोकसभेवर निवडून आले होते. राज्यपालांना दु:ख
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. राज्यपाल टंडन यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दु:ख झाले. त्यांच्यासोबत अनेक वर्षे कार्य करण्याचे सौभाग्य मला लाभले. ते उत्कृष्ट संघटक व संसदपटू होते. बिहार व मध्यप्रदेश राज्यांचे राज्यपाल नात्याने त्यांनी आपल्या घटनात्मक कर्तव्यांचे निष्ठेने पालन केले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक सच्चा लोकसेवक गमावला आहे, असे राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
Check Also
नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला
राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!
‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …