नागपूर : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी सायंकाळी सीताबडी, कॉटन मार्केट परिसर, सुभाष रोड भागात अचानक भेट देत दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी केली.
राज्याच्या उपराजधानीत कोरोना संसर्ग वेगाने वाढत असून नागपूरवासी बेजबाबदार वागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे प्रत्यक्ष कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. त्यांनी बाजारपेठांचा आकस्मिक दौरा केला. बर्डी, कॉटन मार्केट परिसर, सुभाष रोड, चिटणवीस पार्क, शिवाजी पुतळा, गांधीसागरदरम्यान कोविड महामारीबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाºया दुकानदारांवर आणि लोकांवर कारवाई केली. याशिवाय ज्या दुकानांतील कर्मचारी अथवा येणारा ग्राहक मास्कचा वापर करताना आढळला नाही, त्यांना दंड ठोठावण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मनपाच्या अधिकाºयांनी संंबंधित दुकानदारांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली.
आयुक्त मुंढेंनी केली दुकानदारांची कानउघाडणी
Advertisements
Advertisements
Advertisements