Breaking News

आंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला

Advertisements

सांगली : पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला असल्याचे समजते. हा टँकर 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर 10 रुपयांची वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, गोकुळ दूध संघाने स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाला दिलेला पाठिंबा मागे घेत सकाळचे दूध संकलन आणि दूध वाहतूक सुरू ठेवली होती. त्यानंतर टँकरला लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षेसाठी एसओपी, औरंगाबाद येथील घटनेनंतर सरकारचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात …

पदवीधर निवडणूक : नागपुरातून भाजपचे संदीप जोशी रिंगणात

नागपूर, 09 नोव्हेंबर : राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती मदतारसंघात पदविधर आणि शिक्षक मतदारसंघातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *