Breaking News

बांधकाम कामगारांनी दलालामार्फत नोंदणी करु नये – दलालामार्फत फसवणूक होत असल्यास गुन्हा दाखल करावा – पी.डी चव्हाण

Advertisements

वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:-  महाराष्ट्र   इमारत व इतर बांधकाम  कल्याणकारी मंडळाअंतर्गत   नोंदणी केलेल्या बांधकाम कामगार व इतर कामगारांसाठी विविध योजना सुरु करण्यात आलेल्या आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  बांधकाम कामगारांना मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर नोंदणी दलाला मार्फत   पैसे घेऊन होत आहे, अशा तक्रारी  कार्यालयास प्राप्त होत आहे. त्यामुळे  बांधकाम कामगारांनी  कोणत्याही दलाला मार्फत  नोंदणी करु नये.  दलाल  पैसे घेऊन नोंदणी करुन देण्याचे अमिष दाखवित असल्यास  पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा  दाखल करावा, व तशी लेखी तक्रार पुराव्यासह या कार्यालयास सादर करावी. तसेच यापुढे बांधकाम मजुरांनी ऑनलाईन नोंदणी करावी,  असे आवाहन जिल्हा कामगार अधिकारी पवनकुमार  चव्हाण यांनी केले आहे.

Advertisements

वर्धा जिल्हयात  30 जुलै पर्यंत  एकुण 92 हजार 717 कामगारांची  नोंदणी झाली असून 53 हजार 293 नोंदणीचे नुतणीकरण करण्यात आले आहे. जिल्हयात  बांधकाम मजुराकरीता  ऑनलाईन नोंदणीची,  नुतनीकरणाची व विविध योजनेच्या लाभाचे अर्ज  ऑनलाईन स्विकारण्याची कामे   महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम  कामगार कल्याणकारी मंडळ,  जिल्हा कामगार सुविधा केंद्र , प्लॅाट क्रमांक 41, वार्ड क्रमांक  10,  घर क्रमांक 293 प्रतापनगर येथे   करण्यात येत आहे.  त्यामुळे सर्व बांधकाम  मजुरांना आवाहन करण्यात येते  की, त्यांनी  आपली कामे  प्रतापनगर  कार्यालयातुन  स्वत: जावुन  करुन घ्यावीत.  कोणीही  बाहेरील  स्वयंघोषित  दलालाकडून  आपली कामे करुन घेऊ नये  किंवा  भुलथापांना बळी पडुन आपली फसवणुक करुन घेऊ नये, त्याकरीता कार्यालय जबाबदार राहणर  नाही असे जिल्हा सरकारी कामगार अधिकारी पी.डी चव्हाण यांनी कळविले आले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

चंद्रपुरातील 30 वाघांचे संभाजीनगर,गोंदिया, कोल्हापूर, अमरावती जिल्ह्यात स्थलांतरण

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच अलीकडील घटना लक्षात घेता मानव-वन्यजीव …

गडकरींच्या संकल्पनेला ‘काँग्रेस’ची मान्यता ; महामार्गावरील बांबू बॅरिअरचा पहिला प्रयोग विदर्भात

200 मीटर लांबीचे हे बॅरिअर सध्या वणी ते वरोरा महामार्गावर लावण्यात आले आहे. या बॅरिअरचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *