अंबाजोगाई(दि.7सप्टेंबर):- येथील नगर परिषद कार्यालय अंतर्गत घनकचरा संकलनाचे काम करणारी कंपनी बी. के. एन. एस. एस. एस. ने काम बंद केल्यामुळे येथील सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे उपोषण सुरू केले आहे.. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत आम्ही उपोषण मागे वळून घेणार नाही.. सर्व सामान्य माणसाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज उपोषण सुरू केले आहे.. कोरोनाच्या शेकडो कामगाराच्या हाताला काम नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर आहे.
प्रत्येक कामगाराला १५ हजार प्रतिमाह देण्यात यावे. आणि सर्व कामगार मंजूराचे आरोग्य विमा पॉलिसी काढून घेण्यात यावे. आणि भविष्य निर्वाहा निधी आमलात आणावी. आणि अचानकपणे अपघात झाल्यास १०.००० रू तात्काळ मदत देण्यात यावी. सर्व कामगारांचे नॅशनल बँकेतून दर महा पगार व्हावा.. समाम काम किमान वेतन लागू करावे.. या सर्व मागण्या संदर्भात नगर परिषद ला निवेदन देऊन उपोषण सुरू आहे.
या सर्व मागण्या प्रलंबित आहेत.. हे आमच्या मागण्या लवकरच मान्य करून सफाई कामगारांना योग्य ते न्याय मिळावा.. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रहार ला चांगलच माहीत आहे. बच्चू भाऊ च्या आदेशानुसार आम्ही गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, यांच्या हितासाठी रात्र दिवस खंबीर पणे लढत आहोत.. आमचा लढा सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे.. आमचा लढा दिव्यांग बांधवांसाठी जिथे विषय गंभीर तिथे विलास कोळुंके खंबीर आमच्या शेतकरी बांधवांना त्रास होत असेल तर आम्ही सहन करुन घेणार नाही..