मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिले पत्र
वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- लंपी आजाराने मोठया प्रमाणात विळखा घातला आहे.पशुपालकांची चिंता वाढली आहे.अनेक जनावरांना आजार जडल्याने तातडीने उपाययोजना करण्यात याव्या,असे निर्देश आमदार डॉ.पंकज भोयर यांनी जि.प.चे मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांना दिले.
सेलू-वर्धा विधानसभा क्षेत्रात शेतक-यांची संख्या मोठी आहे.सेलू तालुक्यातील अनेकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे.अशातच लंपी आजाराने डोके वर काढले आहे.त्यामुळे अनेक जनावरांना त्याची लागण झाल्याने शेतक-यांची धडकी वाढली आहे.या आजाराला रोखने आज निकडीचे आहे.तथापि,पशुधन वाचविण्यासाठी तातडीने लस उपलब्ध करून दयावी,साथ नियंत्रणात आणण्यासाठी सेलू तालुक्यात विशेष मोहीम राबविण्यात यावी, यासाठी अतिरिक्त डॉक्टरांची व्यवस्था करावी,गावो गावी पशुधन अधिका-यांना पाठविण्यात येऊन लसीकरण करण्यात यावे, लसीकरणाची माहिती शेतक-यांना देण्यात यावी,मोहिमेसाठी स्थानिकांची मदत घ्यावी,विशेष दक्षता पथक तयार करण्यात यावे, साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने वेळोवेळी आवश्यक ती पावले उचलण्यात यावी, असे निर्देश आमदार डॉ.पंकज भोयर यांनी दिले.