वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- अनेक खाजगी महाविद्यालयांना शासनाने मान्यता दिली आहे. अशा महाविद्यालयातून विद्यार्थी शिक्षण घेऊन बेरोtगारीच्या समस्येला तोंड देत आहे. यासाठी केद्र शासन शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी नविन शिक्षण धोरण अमलात आणत आहे. या नविन शिक्षण धोरणामुळे शिक्षाणाचा दर्जा सुधारुन विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीस मदत होईल पर्यांयाने विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होईल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सामाजिक न्याय भवन येथे अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकिय निवासी शाळा उमरी मेघे व हैबतपूर येथील माध्यमिक शांलात परीक्षेत विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला शिक्षण सभापती मृनाल माटे, समाज कल्याण सभापती विजय आगलावे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास कांबळे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अनिल वाळके, मुख्याद्यापक संघाचे अध्यक्ष सतिश जगताप, समाज कल्याणचे लेखाधिकारी श्री. टोणपे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचा, गुणाचा व कतृत्वाचा हा सत्कार असून पुढील आयुष्यात अशीच मेहनत घेऊन शिक्षण सुरु ठेवावे यासोबतच माता पित्यांचा आदर करावा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे बाबासाहेब म्हणायचे विद्यार्थ्यांनी शिक्षण हे ध्येय ठेऊन समाजात प्रगती करावी असेही श्री. तडस म्हणाले.
कोविड 19 मुळे देशाच्या आर्थिक परिस्थीती सोबतच सर्वात मोठा फटका शिक्षण विभागाला बसला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत असल्याबाबत उल्हास नरड यांनी सर्व शिक्षकाचे कौतुक यावेळी केले.
प्रास्ताविकातून श्री. वाळके यांनी समाज कल्याण विभागातर्गत चालविण्यात येत असलेल्या उमरी मेघे व हैबतपूर येथील शासकिय निवासी शाळेचा निकाल दरवर्षी 100 टक्के लागत असून यावर्षी याशाळेच्या 16 विद्यार्थ्यांनी 75 टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केले असल्याचे सांगितले. तसेच समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनाची माहिती विद्यार्थ्यांना देऊन शासनाच्या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी मान्यवरांचे हस्ते उमरी मेघे निवासी शाळेतील विद्यार्थी आशुतोष थुल यांनी 93 टक्के व साहिल धनविज यांनी 90 टक्के गुण प्राप्त केल्या बाबत त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय हैबतपूर व उमरी मेघे येथील विद्यार्थी व समाज कल्याण विभागातील कर्मचारी व समाजकार्य महाविद्यालयातील कर्मच्याच्या पाल्यांनी 75 टक्केच्या वर गुण प्राप्त केल्या बाबत मुलांचा तसेच उमरी मेघे येथील शाळेचे मुख्याद्यापक आर अजमिरे, रुपाली केवटे, मिनाक्षी बनकर, निशा नाडे, कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य चंदू पोपडकर, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य बाबा शंभरकर, बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलींद सवाई यांचा सन्माचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन मिनाक्षी बनकर व डॉ. प्रविण वानखेडे यांनी समायोचित केले. कार्यक्रमाल समाजकार्य महाविद्यालयाचे प्राद्यापक, शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.