प्राप्त झालेल्या माहितीनुसार वर्धा येथे चार दिवसाकरिता जनता कर्फ्यु लावण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी श्री सुरेश बगळे यांनी आज दि.13/9/20 रोजी रात्री उशिरा नगर परिषद अधिकारी पदाधिकारी व व्यापारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.वर्धेत दररोज वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असलेला मृत्यूदरची संख्या पाहता वर्धा येथे 4 दिवस जनता कर्फ्यु लावण्याचा विचार प्रशासनाने केला आहे.तत्पूर्वी जिल्हा प्रशासन येथील नगर परिषद अधिकारी,पदाधिकारी,तसेच व्यापारी वर्ग व लोकप्रतिनिधी तथा राजकीय पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून जनता कर्फ्यु करणार असल्याची माहिती समोर आली आहे.हे 4 चार दिवसीय जनता कर्फ्यु येणाऱ्या 18 ते 21 या दिवशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.सदर 4 दिवसीय जनता कर्फ्यु हा वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने घेण्यात येणात आहे त्यापूर्वी सर्व नगर परिषद अधिकारी, पदाधिकारी, व्यापारी,राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन 4 दिवसाचा जनता कर्फ्यु लागू करण्यात येणार आहे.सदर जनता कर्फ्यु हा 17 तारखेचा सर्वपित्री अमावस्या झाल्या नंतर 18 तारखेला शुक्रवार,19 शनिवार,20 रविवार,व 21 सोमवार अश्या या 4 दिवसाचा जनता कर्फ्युची घोषणा करण्याच्या तयारीत जिल्हा प्रशासन आहे.सदर जनता कर्फ्युच्या आदेशामध्ये काय बंद काय सुरू राहणार कुठले दिशानिर्देश असणार आहे हे येणाऱ्या दिवसात प्रशासनाकडून कळवल्या जाणार आहे.तरीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.तसेच शासन नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे.

वर्धा : कोरोना ब्रेकिंग : वर्धेत 4 दिवस जनता कर्फ्यू ,प्रशासन लागले तयारीला
Advertisements
Advertisements
Advertisements