वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- मंगळवार दि.15 – जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढीचा कहर थांबण्याच नाव घेत नसून त्यासोबतच आता दिवसेंदिवस मृत्यू संख्या ही वाढत आहे.मंगळवारी जिल्ह्यात पुन्हा नवीन 112 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यासोबतच आज जिल्ह्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांंचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील मृत्यू संख्या 61 वर जाऊन पोहचली आहे.तसेच आज 56 व्यक्ती कोरोनातून मुक्त झाले आहे.
आज जिल्ह्यात नवे 112 कोरोनाबाधित रुग्णांंमध्ये
1)वर्धा 53 (पुरुष 40 महिला 13)
2)देवळी 21 (पुरुष 18 महिला 3)
3) सेलू 2 (पुरुष 2 )
4)आर्वी 3 (पुरुष 2 महिला 1)
5) आष्टी 4 (पुरुष 3- महिला 1)
6)समुद्रपूर 2 (पुरुष 2 )
7)हिंगणघाट 27 (पुरुष 17, महिला 10)
रुग्णांंचा समावेश आहे असे एकून 112 रुग्ण असून यामध्ये ( 84 पुरुष तर 28 महिला ) यांचा समावेश आहे.
तर मृतकामध्ये पुलगांव येथील 65 वर्षीय पुरुष, वर्धा येथील 65, 50 व 49 वर्षीय पुरुष, जामणी गोजी येथील 70 वर्षीय पुरुष, हिंगनघाट येथील 54 वर्षीय महिला व कारंजा येथील 70 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
आता जिल्ह्यात एकूण मृत्यू 61 व्यक्तींचा मृत्यू झाला असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -60 तर इतर आजारामुळे 1 मृत्यू झाला आहे.आज 630 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 112 पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.
आतापर्यंत एकूण 27980 स्त्राव नमुने कोरोना चाचणीसाठी पाठववले आहे.त्यामधून 27922 अहवाल प्राप्त झाले आहे.यामध्ये 24923 अहवाल निगेटिव्ह आले आहे. 58 अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या 2741 वर पोहचली आहे.
यामध्ये एकूण 1367 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.जिल्ह्यात आता एकूण 1313 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.एकूण गृह विलगिकरण करण्यात आलेल्या व्यक्तींंची संख्या 76795 असून आज 2124 व्यक्ती गृहवीलगिकरणात आहे.