वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शनिवार दि.3, आज 414 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 57 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 90 पुरुष तर 43 महिलांंचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 2 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे .
आज मृत्यू झालेल्यांंमध्ये ( सेलू पुरुष 71,65 वर्षें ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 134 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -133 तर इतर आजारामुळे मृत्यू- 1 चा मृत्यू झाला आहे.तर
आज 42 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये
वर्धा 44 ( पुरुष 21 महिला 23 )
देवळी 6 ( पुरुष 1 महिला 5 )
सेलू 1 ( महिला 1 )
हिंगणघाट 5 ( पुरुष 4 महिला 1 )
कारंजा 1 ( पुरुष 1 ) रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने 37429 असून यामध्ये 37404 अहवाल प्राप्त झाले आहे. तर एकूण 32109 अहवाल निगेटिव्ह आले आहे.तर यामध्ये 25 अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांंची संख्या 4852 झाली असून यामध्ये एकूण 2627 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
आज जिल्ह्यात एकूण 2091 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 77095 व्यक्ती गृह विलगिकरण करण्यात आले आहे.तर यामधून आज 1421 व्यक्ती गृहवीलगिकरणात आहे.
कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज 393 व्यक्तींना रुग्णालयातून सुटी मिळालेली आहे.आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण 1408 व्यक्ती आहे. जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्ण संख्या व मृत्यू संख्या पाहता नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.त्याच सोबत शासन नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे.