वर्धा प्रतिनिधी :- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तीची जिभ कापण्यात आली . माणेचे हाड मोडण्यात आले . तेव्हा पासुन ती तरुणी मुत्यु शय्येवर होती . हा मंगळवार दिनांक २९ रोजी दिल्ली च्या सफरदजंग रुग्णालयात या तरुणीचा मुत्यु झाला . मुत्युनंतरही तीच्या वर अत्याचार होतच राहीले आणि उत्तर प्रदेश च्या योगी सरकारने या मुलीच्या कुंटुबीयांना घरात कोंडुन बळजबरीने तीच्या मृत देहाची परस्पर विल्लेवाट लावली . कुलदीप सिंग प्रकरणापासुन उत्तर प्रदेशात अशा असंख्य घटना मुख्यमंत्री योगी सरकारच्या काळात सतत घडत आहे .आणि अपराध्यांना शासन करण्या ऐवजी उत्तर प्रदेश सरकार त्याची पाठराखन करत आहे . त्यामुळे अशा घटना करणाऱ्या अपराध्यांचे मनोधर्य वाढत असुन या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

हाथरस घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या वर्धेतील विविध पुरोगामी सामाजिक संघटनेची महामहिम राष्ट्रपती यांना निवेदनातुन मागणी
Advertisements
Advertisements
तरी वर्धा जिल्हातील सर्व सामाजीक संघटना व समविचारी पक्षाच्या वतीने या प्रकरणांची दखल घेऊन अशा प्रकारच्या घटनाकरणाऱ्या नराधम अपरांध्याना कटोरातील कठोर अशी मृत्यु दंडाची कारवाई करुन तत्काळ शिक्षा देण्यात यावी. व देशातील तरुणीवर अत्याचार करणाऱ्या अपरांधावर जरब बसवावी या मागणीचे निवेदन वर्धेतील विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या वतीने महामहिम राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंंद यांना मा.पालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी अँडोकेट पूजा जाधव,प्राध्यापक नूतन माळवी,शारदा झामरे,अँडोकेट कापीतवृक्ष गोडघाटे,प्राध्यापक भोईकर,सुधीर पांगुळ,सुहास खंडारे,शारदा धनविज इत्यादीसह क्रांतीज्योती संस्था वर्धा,सप्तशोधक महिला प्रबोधिनी,संबुद्ध महिला संघटन,युवा सोशल फोरम,महिला राजसत्ता आंदोलन,महाराष्ट्र अनिस,जिजाऊ बिग्रेड,महाराष्ट्र दारूमुक्ती संघटना,राष्ट्र सेवादलासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Advertisements