वर्धा : सचिन पोफळी :- SBI ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांच्या अंतर्गत गेल्या 3 वर्षांपासून महात्मा गांधींच्या संकल्पनेतील आदर्श गावाची संकल्पना घेऊन SBI ग्रामसेवा प्रकल्प आर्वी तालुक्यातील पांजरा , बोथली, सुकळी, भादोड, उमरी , या गावांमध्ये काम केले यामध्ये 30 सप्टेंबर ला हा प्रकल्प पूर्ण झाला यामध्ये गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 अक्टोबर ला प्रकल्पाचा साहित्य हस्तांतरण सोहळा प्रकल्पातील पांजरा या गावांमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला ,यामध्ये प्रथम गांधीजी च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमला सुरवात करण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मंगेश पांडे यांनी केले , नंतर प्रकल्प व्यवस्थापक श्री पराग काळे यांनी सांगितले आहे आजपर्यंत झालेल्या कामाचा लेखाजोखा ग्रामस्थांसंमोर मांडला , नंतर श्री हनुमंत चरडे सभापती आर्वी आपल्या योजनाबाबत उपस्थितांना माहिती दिली , नन्तर श्रीमती मंजुषा जोशी SBI chief manager नागपुर यांनी लोकांना मार्गदर्शन केले , नन्तर समाज कार्यकर्ते रवींद्र तंदुलकर यांनी आभार प्रदर्शन केलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती मंजुषा जोशी ( SBI chief manager नागपूर ) श्री हनुमंतभाऊ चरडे ( सभापती आर्वी ) प्रकल्प व्यवस्थापक श्री पराग काळे , पाचही गावातील सरपंच , उपसरपंच,सचिव गाव विकास समिती अध्यक्ष .सचिव समाज कार्यकर्ते स्वप्नील नेहारे ,मंगेश पांडे, अजिंक्य काकडे, गावकार्यकर्ते , क्लास टिचर व समस्त नागरिक उपस्तीत होते , या कार्यक्रमानन्तर झुम मीटिंग द्वारे SBI फाउंडेशन च्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत गावकर्यांनी चर्चा केली , नन्तर प्रेरणा शिलाई केंद्र पांजरा येथे शिलाई प्रशिक्षण घेतलेल्या युवतींना प्रमाणपत्र वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रम Covid 19 च्या नियमांचे पालन करून घेण्यात आला
Check Also
वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण
वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा
वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …