बुलढाणा : मलकापूर ( बो) :- आज घडीला संपूर्ण भारत देशात एकूण दहा हजार पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होत आहेत. अशीच एक कंपनी बुलढाणा जिल्ह्यात कृषि विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था द्वारा तयार करण्यात आली जय सरदार कृषिविकास शेतकरी उत्पादक कंपनी मागील 5 वर्षांपासून कार्यरत आहे. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कामे केली जात आहेत.
गेल्या हंगामात जय सरदार कृषिविकास शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत मका खरेदी केली गेली. मका विक्रीवर कंपनीला चांगला नफा मिळाला त्यामुळे संचालक मंडळाने ठरविले की ज्या शेतकऱ्यांनी कंपनीत माल विक्री केला त्या सर्व शेतकऱ्यांना मिळालेल्या नफ्यातून बोनस द्यावा. आणि आज त्याचे औचित्य साधण्यात आले. दिनांक- 10 ऑक्टोबर 2020 रोजी नरेंद्र नाईक (जिल्हा कृषी अधीक्षक बुलढाणा), मा संतोष डाबरे, उपविभागीय कृषी अधिकारी , मा. दिलीपजी नाफडे (अध्यक्ष, जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनी), मा भारत कासार, तालुका कृषी अधिकारी यांच्या हस्ते आज सर्व शेतकऱ्यांना बोनस कार्ड वाटप करण्यात आले.
या प्रसंगी नाईक मनोगत करतांना म्हणाले संपूर्ण भारत देशात दहा हजार पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत परंतु की माझ्या संपूर्ण कारकिर्दीत शेतकऱ्यांना आपल्या नफ्यातून बोनस देणारी ही पहिली शेतकरी उत्पादक कंपनी पहिली.जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनी हे शेतकरी हिताचे काम करीत आहे त्यामूळे याचा फायदा अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना कृषि विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमित नाफडे म्हणाले की, ज्या काही मार्गाने शेतकऱ्यांचा विकास साधता येईल ते सर्व मार्ग वापरून जास्तीत जास्त नफा शेतकऱ्यांना देण्याचे कार्य कंपनी मार्फत केले जाईल.तसेच भारत सरकारने APMC सेस ची रक्कम माफ केल्यास त्याचा देखील फायदा शेतकऱ्यांना देण्यात येईल.
कार्यक्रमासाठी संचालक मंडळ व सदस्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय सरदारचे सदस्य.श्री.आशिष नाफडे यांनी केले याप्रसंगी कंपनीचे संचालक श्री. सुनीलजी चोपडे , जयेशभाऊ पाटील, माकोडी सरपंच भानुभाऊ इंगळे व मान्यवर शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय सरदार व कृषी विकास टीम यांचे सहकार्य लाभले.