वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- वर्धा लोकसभा क्षेत्रातील ग्रामपंचाय पिपरी ( मेघे ) व नगर परिषद हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा च्या माध्यमातुन रस्ते विकासाचे कार्य प्रगतीपथावर आहे.परंतु अद्यापर्यंत सदर कामाच्या अंतर्गत येणारे अप्रोच रस्ते , विद्युतीकरण , डिवाइडर तथा इत्यादी आवश्यक असलेले रस्ते सुरक्षा विषयक कामे पुर्ण न केल्याने असंख्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आणी यासाठी आतापर्यंत खासदार रामदास तडस यांच्या कडे स्थानिक लोकप्रतिनीधी व रहिवासी यांनी अनेक तक्रारी केल्या आहे.
खासदार रामदासजी तडस यांनी लोकप्रतिनीधी व रहिवासी यांच्या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूर अधिक्षक अभियंता यांना पत्र लिहले व पत्राच्या माध्यमातून या विषयी जातीने लक्ष देवून मौका पाहणी करिता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा यांना निर्देशीत करुन सहकार्य करावे अशी विनंती या पत्रातून केली आहे .या पत्राच्या माध्यमातून अद्यापर्यंत सदर कामाच्या अंतर्गत येणारे अप्रोच रस्ते , विद्युतीकरण , डिवाइडर तथा इत्यादी आवश्यक असलेले रस्ते सुरक्षा विषयक कामे पुर्ण न केल्याने असंख्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे . रस्त्याची उंची वाढल्याने अप्रोच रस्त्यांना सिमेंटीकरण करणे क्रमप्राप्त होते परंतु अॅप्रोच रस्त्यांची कामे प्रलंबीत असल्याने पिपरी ( मेघे ) परिसरात रोज अपघात घडत आहे . आपण या विषयी जातीने लक्ष देवून मौका पाहणी करिता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा यांना निर्देशीत करुन सहकार्य करावे असेही या पत्रात खासदार तडस यांनी म्हटले आहे.