Breaking News

कोरपना न.पं.घनकचरा निविदा,रस्ते बांधकाम घोटाळा प्रकरण.

Advertisements

 

राज्यमंत्री तनपुरे यांनी दिले चौकशीचे निर्देश

Advertisements

कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:-

Advertisements

कोरपना येथील बहुचर्चित घनकचरा निविदा व रस्ते बांधकाम घोटाळा प्रकरण गेल्या 4 वर्षांपासून गाजत असून यासंबंधी स्थानिक नगरसेवकांनी अनेक तक्रारी केल्या मात्र संबंधित अधिकारी चौकशी न करता कहींचे हीत जोपासत असल्याचे आरोप होत आहे. दरम्यान महाराष्ट्राचे नगरविकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे हे चंद्रपूरच्या दौऱ्यावर आले असता राकाँ नेते सैय्यद आबीद अली यांनी एका शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन मंत्री महोदयांपुढे कोरपना नगरपंचायतीच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी केली आहे.

घनकचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहार, कंत्राटदाराची मनमानी व इतर विकास कामात सुरू असलेला भोंगळ कारभार,उदाहरणार्थ अंदाज पत्रकाप्रमाणे काम करणे,मंजूर ठिकाणी बांधकाम न करणे,अंदाज पत्रक फुगवून तयार करणे,अंदाजपत्रकाच्या तरतुदीनुसार साहित्याचा वापर न करणे, कामाचा दर्जा निकृष्ट,सर्वसाधारण सभेच्या निर्णयाची अंमलबजावणी न करणे, प्रस्तावित कामांची लांबी-रुंदी कमी करून अंदाजपत्रक तयार करणे,एकच काम दोन निधीतून दाखविणे,झालेल्या बांधकामाचे नव्याने प्रस्ताव तयार करून मान्यता घेणे,प्रशासकीय मान्यता अटी व शर्तींचा भंग करणे,शाखा अभियंताचे नियंत्रण नसणे,कामाचे ले-आउट स्वतः ठेकेदारांमार्फत करून घेणे,अशाप्रकारे अनियमितपना व गैरव्यवहाराचे पाढेच मंत्र्यापुढे वाचले यावेळी जिल्हा नगरप्रशासन अधिकारी उपस्थित होते.

मंत्री महोदयांनी याप्रकरणाची दखल घेण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला देत चौकशीचे निर्दोष दिल्याची माहिती असून योग्य चौकशी झाल्यास येथील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.नगरसेवक सोहेल अली,अमोल आसेकर, सुभाष तुरणकर यांनी पुराव्यानिशी मजुरांचे झालेले शोषण,वाहन वाहतूक व्यवस्थेत गैरव्यवहार,कंत्राटदाराच्या नावावर पदाधिकाऱ्यांचा लाभ घेण्याचे प्रयत्न इत्यादी विषय नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत उचलून धरले होते हे मात्र विषेश

Advertisements

About Vishwbharat

Check Also

*राज्यात कोरोना च्या चौथ्या लाटेचा धोका*

  सध्या कोरोनाच्या Omicron BA.2 व्हेरिएंटमुळे चीन आणि दक्षिण कोरियासह युरोप आणि आशियाच्या काही भागांमध्ये …

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *