Breaking News

घनकचरा व्यवस्थापनात मोठा भ्रष्टाचार,मुद्दतवाढ थांबवा. “नगरसेवक सुहेल अली”

कोरपना ता.प्र.सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना शहरातील घराघरातून कचरा संकलन करून रिक्षा,घंटागाडीच्या सहाय्याने वाहतूक करण्याचा करार नगरपंचायतने केला आणि सदर प्रक्रिया गेल्या 3 वर्षांपासून राबविली जात आहे.यासाठी संबंधित कंत्राटदाराच्या नावाने करारनामा करण्यात आला.असे असताना प्रत्यक्षात मात्र पेटी कॉन्टॅक्टमध्ये पदाधिकारीच काम करीत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. करारनाम्यातील अटी-शर्तीला तिलांजली देत कंत्राटदार मजुरांना अल्प दर देऊन संगनमताने शोषण करीत असल्याचे आरोप होत असून मजुरांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार संगनमताने अविरत सुरू असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्याची माहिती आहे.क्षमतेपेक्षा कमी रिक्षा व मजूर लावणे,करारनामानुसार कामे न हाताळणे, वाहन वाहतुकीचा वापर पूर्ण वेळ न करता संपूर्ण महिन्याच्या रक्कमेची उचल करणे, यामुळे मोठा भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याचा आरोप नगरसेवक सुहेल आबीद अली यांनी केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
येथील अनेक वार्डात कचऱ्याचे ढिगारे साचले आहे,नाल्या सांडपाण्याने भरगच्च भरले आहे,यापूर्वी सुद्धा नगरपंचायतने याच कंत्राटदाराला मुदतवाढ देऊन गैरव्यवहार करण्यासाठी रान मोकळे केल्याचा आरोप करत अनेक नगरसेवकांच्या तक्रारी असताना पदाधिकारी या कंत्राटदारावर मेहेरबान का ? निविदा प्रक्रियेत घोटाळा करून एकाच कंत्राटदाराला काम देण्यामध्ये पदाधिकाऱ्यांचे हित गुंतले आहे का ? दोन वर्षांपासून निविदा न काढता मुदतवाढ देणे तसेच तांत्रिक मूल्यांकनात पात्रता नसताना एकाच एजंसीला काम देण्यामागे घनकचरा घोटाळा असून अटी-शर्ती भंग करीत असताना याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष न देता नियमबाह्य कामाचे देयके का देतात ? हा प्रश्न नागरिक उपस्थित करीत असून 18 तारखेला होणार्‍या सर्वसाधारण सभा घनकचर्‍यावरून वादग्रस्त ठरणार असल्याचे चित्र असून मुदतवाढ देऊ नये,निविदा प्रक्रिया घेऊनच नव्याने कंत्राटदार निश्चित करावा अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली असून यापूर्वी केलेल्या तक्रारीवर नगरपंचायतीने कोणती कारवाई केली, सभागृहाच्या पटलावर जाहीर करावे अशी भुमिका नगरसेवकांनी घेतल्याची माहिती असून यामुळे गेल्या 3 वर्षांपासून सुरु असलेला घनकचरा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.घनकचरा व्यवस्थापनात मोठ्याप्रमाणात घोटाळा झाल्याच्या आरोपांना उधाण आले असून भ्रष्टाचारामुळे बिचाऱ्या मजुरांचे सर्रासपणे शोषण होत असल्याचे पाहून नाराजीचे सूर उमटत आहे.कम्पोस्ट खड्ड्यावर लाखोंचा खर्च करण्यात आला मात्र तहसील पुढे बांधलेल्या शेडमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्यापासुन खत तयार होत असल्याचे चित्र दिसत आहे.

नगरप्रशासनाच्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष व भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचे आरोप काही नगरसेवक करीत असून “मुदतवाढ देऊ नये” अशी भूमिका यांनी घेतल्याने अखेरची सभा वादग्रस्त ठरणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आज व उद्या पावसाचा अंदाज

राज्यासह उन्ह पावसाचा खेळ सुरु आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि …

गडचिरोलीतील आलापल्ली-सिरोंचा रोडच्या दूरवस्थेची याचिका हायकोर्टात

गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा या १०० किलोमीटर रोडच्या दूरवस्थेवर दोन आठवड्यात उत्तर सादर करा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *