Breaking News

बस अभावी विद्यार्थ्यांचे हाल,आगार प्रमुखांना निवेदन.

(भाजयुमो जि.उपाध्यक्ष आशिष ताजने यांचे नेतृत्व.)

कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:-चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आगारातर्फे चालत असलेल्या नारंडा,वनोजा,कढोली(खु)येथील बंद करण्यात आलेली बससेवा सुरू करण्यासाठी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी राजूरा आगार प्रमुख आशिष मेश्राम यांना निवेदन दिले.कोरोना काळात लॉकडाऊन घोषित होण्यापूर्वी सदर बससेवा सतत सुरू होत्या.नंतर सर्व बससेवा बंद करण्यात आल्या. आता हळूहळू अनलॉककडे वाटचाल सुरू असल्याने इतर गोष्टींसह विद्यालय,महावियालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना बससेवा उपलब्ध होत आहे.मात्र निवेदनात नमूद केलेल्या बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे.

सदर बाब विद्यार्थ्यांनी ताजने यांच्या निदर्शनास आणून दिली असता ताजने यांनी विद्यार्थ्यांसह आगार प्रमुखांची भेट घेऊन सदर बससेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी वजा विनंती केली.बससेवा तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन आगार प्रमुख मेश्राम यांनी उपस्थितांना दिले.यावेळी निवेदन देतांना अजय तिखट,मयूर महाडुले,प्रज्वल लांडगे, रोशन मालेकर,मदन काकडे,हर्षल चामाटे, मयूरी जुमनाके,पूजा मोहूर्ले,जानवी चुर्हे,प्रांजली मत्ते,अंजली वेट्टी,फालगूनी लोहे,कोमल मत्ते, प्रतीक्षा लोहे,सलोनी लोहे,प्रिया मूक्के,अश्विनी बोरकर,मीनल रोगे,वैष्णवी पाचभाई यांची उपस्थिती होती.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …

१२ भाविकांचा मृत्यू : मौनी अमावस्येला महाकुंभात चेंगराचेंगरी : शाही स्नान रद्द

महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *