Breaking News

स्थायी समिती सभापतीपदी श्री. रवी आसवानी यांची निवड.

Advertisements

चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी श्री. रवी आसवानी यांची निवड.  
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. चंद्रकला पंडित सोयाम  
महिला व बालकल्याण समिती उपसभापती सौ. पुष्पा संजय उराडे  
प्रभाग समिती क्र. १ ( झोन क्र. १ ) सभापतीपदी श्री. राहुल अरुण घोटेकर  
प्रभाग समिती क्र. २ ( झोन क्र. २ ) सभापतीपदी श्री. संगीता राजेंद्र खांडेकर    
प्रभाग समिती क्र. ३ ( झोन क्र. ३ ) सभापतीपदी श्री. अंकुश नामदेव सावसाकडे

Advertisements

चंद्रपूर ५ फेब्रुवारी –  चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी (CCMC Standing Committee) रवी आसवानी यांची बिनविरोध निवड झाली असून झोन क्र. १ मधे श्री. राहुल अरुण घोटेकर, झोन क्र. २ मधे सौ.संगीता राजेंद्र खांडेकर, झोन क्र. ३ मधे श्री. अंकुश नामदेव सावसाकडे यांची झोन सभापतीपदी तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. चंद्रकला पंडित सोयाम  व उपसभापतीपदी सौ. पुष्पा संजय उराडे यांचीही निवड बिनविरोध झालेली आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी केल्यानंतर पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. अजय गुल्हाने यांनी निर्णय घोषित केला.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती, झोन सभापती व महिला व बालकल्याण समिती विद्यमान सभापतींचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने या विविध समिती सभापतीपदासाठी निवडणुक  ५ फेब्रुवारी रोजी मनपा राणी हिराई सभागृहात सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत पार पडली. निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी श्री. अजय गुल्हाने यांनी काम पाहीले. याप्रसंगी व्यासपीठावर मनपा उपायुक्त श्री. अशोक गराटे उपस्थित होते.
स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे श्री. रवि आसवानी रिंगणात होते. इतर कुणीही निवडणुक कालावधीत नामनिर्देशन पत्र न भरल्याने श्री. रवि आसवानी यांची बिनविरोध निवड झाली.
झोन क्र. १ मधे श्री. राहुल अरुण घोटेकर, झोन क्र. २ मधे सौ.संगीता राजेंद्र खांडेकर तर झोन क्र. ३ सभापतीपदासाठी श्री. अंकुश नामदेव सावसाकडे  तसेच तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. चंद्रकला पंडित सोयाम  व उपसभापतीपदी सौ. पुष्पा संजय उराडे यांच्याविरुद्ध कुठलाही अर्ज दाखल न झाल्याने सर्वांची निवड अविरोध झाली.
याप्रसंगी सर्व स्थायी समिती सदस्य, उपायुक्त अशोक गराटे,  सहायक आयुक्त विद्या पाटील  नगरसचिव नेहारे तसेच महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *