वरोरा:-
वरोरा नगर परिषदेतील सण 2021-22 यावर्षीचे अंदाज पत्रक नगराध्यक्ष अहंतेश्याम अली यांनी दिनांक 23- 2- 2021 ला झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर केले व ते सर्वानुमते अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. शहरातील सर्वांगिन विकास साधण्याकरिता तसेच आरोग्य व मूलभूत सोयी नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबत नगरपरिषदेची 2021-22 मध्ये प्राथमिक शिल्लक धरूण अंदाजित जमा रक्कम रुपये 108 कोटी 22 लाख 42 हजार 136 इतकी प्रस्तावित असून त्या वर्षात अंदाजित एकूण रुपये 108 कोटी 13 लाख 72 हजार 500 खर्च दाखविण्यात आलेला आहे. सन 2021- 22 करिता दिनांक 31-03-21 ला रुपये 8 लाख 69 हजार 636 इतक्या रकमेचे शिलकी अंदाजपत्रक सादर केले. अर्थसंकल्पात राज्य नगरोत्थान अभियान अंतर्गत वरोरा शहरातील विस्तारित पाणीपुरवठा योजना राबविणे, प्रधानमंत्री आवास योजना, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट उभारणी करणे, दिव्यांग लाभार्थी करिता रुपये 30 लाखाची तरतूद, महिला व बाल विकास या करिता तरतूद, लायब्ररी व चिल्ड्रन पार्क बांधकाम, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन तसेच मागासवर्गीयांच्या विकासाकरिता विशेष तरतूद इत्यादी बाबींचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला.
सदर अर्थसंकल्पाचे वाचन सुरेश वदनलवार लेखापाल यांनी केले. अर्थसंकल्प सादर करतेवेळी उपाध्यक्ष अनिल झोटिंग, विरोधी पक्ष नेता गजानन राव मेश्राम, सर्व समितीचे सभापती व नगरसेवक उपस्थित होते. अर्थसंकल्प तयार करण्याकरिता मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, कार्यालय अधीक्षक गजानन आत्राम, लेखापाल सुरेश वदनलवार , सहाय्यक लेखा परीक्षक राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ लिपिक सुनील बोस व कनिष्ठ लिपिक कु. अंबिका गिरसावळे इत्यादींनी विशेष सहकार्य केले. तसेच अर्थसंकल्पाचे सभेला नगर परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. अर्थसंकल्प मंजूर केल्याबाबत नगराध्यक्ष अहंतेशाम अली यांनी उपस्थित सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.