पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षली ठार
– एटापल्ली तालुक्यातील घटना
अहे-
गट्टा-जांबिया जंगल परिसरात नक्षल असल्याची गोपनीय माहिती पोलीस विभागाला प्राप्त झाली होती. त्या मिळालेल्या माहितीवरून आज सकाळच्या सुमारास शोधमोहीम राबवीत असतांना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. पोलीस जवानानेही नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर देत दोन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया पोलीस मदत केंद्रां अंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली असून यात दोन नक्षली ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गट्टा- जांबिया पोलीस मदत केंद्राजवळ २२ एप्रिल च्या मध्यरात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी गोळीबार केला होता.
यावेळी सतर्क होऊन पोलीसांनी जशाच तसे सावध पवित्रा घेत गोळीबारास प्रत्युत्तर दिले. रात्रीच्या अंधारात पोलीसांना बाहेर येण्यास प्रयत्न करून घातपात घडविण्याच्या नक्षल्यांचा मोठा मनसुबा होता. त्यासाठी नक्षल्यांनी गोळीबार करून एक हॅन्डग्रेनेडह फेकला होता. त्यामुळे पोलीस विभागही सतर्क होऊन नक्षलयांचे मनसुबे हाणून पाडले असून याच भागातील जंगल परिसरात नक्षलविरोधी शोधमोहिम अधिक तीव्र केले आहे. आज सकाळी नक्षल असल्याचे माहिती प्राप्त झाले असता त्या माहितीच्या आधारावर शोधमोहीम राबवीत असतांना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीसांच्या दिशेने अत्याधुंद गोळीबार केला. सी-६० पोलीसांनी त्यास चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला असता या चकमकीत दोन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात मोठे यश आले आहे.