Breaking News

निरंकारी मिशन पर्यावरण रक्षणार्थ दृढप्रतिज्ञ

निरंकारी मिशन पर्यावरण रक्षणार्थ दृढप्रतिज्ञ

(जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष)

जेव्हा आमच्या दूरदर्शी महापुरुषांनी ‘वसुधैव कुटुम्बकम’ या दोन अनमोल शब्दांचा उद्घोष केला तेव्हा त्यांनी निश्चितपणे मानवजात व प्रकृती यांच्या संयुक्त अस्तित्वाबाबत सकारात्मक दृष्टीकोन अंगिकारण्याचा सल्ला दिला, जो आपल्या अस्तित्वाचा आधार आहे. “विधात्याने निर्माण केलेल्या संपूर्ण सृष्टीची काळजी घेणे आमचे परम कर्तव्य आहे”.  ही अनमोल वचने संत निरंकारी मिशनची आध्यात्मिक प्रमुख सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचा संदेश आहे जो पर्यावरणाच्या प्रति मानवी दृष्टीकोनामध्ये सतत परिवर्तन घडवून आणण्यासाठी सहाय्यक सिद्ध होत आहे. मिशनने आपली सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटबल फाउंडेशनच्या माध्यमातून मागील अनेक दशके वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि जल संरक्षण यांसारखे कित्येक उपक्रम राबवून जगभरात आपला ठसा उमटविला आहे. या वर्षी २३ फेब्रुवारी रोजी ‘बाबा हरदेवसिंहजी यांच्या ६७व्या जन्मदिनी संत निरंकारी मिशनने टाईम्स ऑफ इंडिया (TOI) समूहाबरोबर संयुक्तपणे संपूर्ण भारतभर १ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. या अभियानाअंतर्गत सहभागी झालेल्या व्यक्तींनी त्यांनी लावलेल्या झाडाचे ती आत्मनिर्भर होईपर्यंत सलग तीन वर्षे पोषण व रक्षण करण्यासाठी प्रेरित केले गेले आहे.

मिशन व मिशनच्या अनुयायांनी या अभियाना अंतर्गत रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, नद्या, उद्याने यांच्या स्वच्छतेबरोबरच वृक्षारोपणामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. परिणामी भारत सरकारने मिशनला आपल्या स्वच्छ भारत अभियानाचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. जल संचय, सौर ऊर्जेचा वापर, हरित इमारत मानकांचा अंगिकार करणे आणि मिशनकडून राबविले जाणारे अशा प्रकारचे कित्येक उपक्रम पर्यावरण रक्षणाच्या प्रति मिशनची गंभीरता दर्शविते.

या व्यतिरिक्त संत निरंकारी मिशन रक्तदान, शिक्षण, मोफत आरोग्य शिबिरे, नैसर्गिक आपत्तीत आपदग्रस्तांना मदत आणि पुनर्वसन, गावे दत्तक घेणे, युवा व महिला सशक्तीकरण कार्यक्रम असे अनेक कल्याणकारी उपक्रम राबवून समाजाला सुविधा प्रदान करत आहे.

कोविड-१९ च्या वैश्विक महामारीच्या काळात मिशनकडून हजारो गरजू परिवारांची सेवा करण्यात येत आहे. याशिवाय सध्या संपूर्ण भारतातील संत निरंकारी सत्संग भवनं लसीकरण केंद्रांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्याबरोबरच कोरोना महामारीतून लोकांचा बचाव करण्यासाठी संत निरंकारी मिशनद्वारा सद्गुरु माताजींच्या आशीर्वादाने व दिल्ली सरकारच्या सहयोगाने कोविड-१९ हेल्थ सेंटरच्या रूपात १००० बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्यात आले आहे. याशिवाय इतर राज्यांमध्ये तेथील सरकारी यंत्रणांच्या सहयोगाने अनेक भवनं कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात येत आहेत.

या वर्षी विश्व पर्यावरण दिवसानिमित्त कोणताही उपक्रम राबविण्यासाठी देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक मर्यादा पडत असल्याने नियमितपणे अखिल भारतीय अभियान राबविणे शक्य होत नाही; परंतुपर्यावरण समतोलाची पुन:स्थापना करण्याचा संदेश जो २०२१ मध्ये संयुक्त राष्ट्रांचा विषय आहे तो वर्चुअल रूपात सर्व निरंकारी भक्तगणांना अवगत करण्यात आलेला असून आपापल्या स्थानिक परिस्थितीबाबत जागरुक राहण्यासाठी प्रेरित केले आहे. सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी पर्यावरणाचा समतोल ठेवण्याच्या बाबतीत जागरुक होण्याचे आवाहनकेले आहे. त्यांनी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या उद्घोषाचा पुनरुच्चार करताना म्हटले, की बाह्य प्रदूषण दूर करण्याबरोबरच आपल्या मनांमध्ये साठलेल्या घृणा, लालसा, अहंकार, अज्ञान यांसारख्या प्रदूषणालाही दूर करण्याची गरज आहे. यातूनच जगामध्ये शांतीपूर्ण व प्रेममय वातावरण स्थापित होऊ शकेल.

About Vishwbharat

Check Also

उन्हामुळे नागपुरात ४ जणांचा मृत्यू

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *