पात्र उमेदवारांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यावा
चंद्रपूर,दि.7 जून: राज्यामध्ये कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. यासाठी पॅरामेडिकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत हेल्थ केअर सेक्टर स्किल कौन्सिलमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहाय्यक आयुक्त, भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत कोविड-19 च्या प्रादुर्भावात वैद्यकीय क्षेत्रातील एकूण 5 प्रकारचे प्रशिक्षण, कोर्सेस उपलब्ध आहे. सदर प्रशिक्षण व कोर्सेसकरीता वयाची कमाल मर्यादा ही 18 ते 30 वर्ष आहे. यामध्ये आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ प्रशिक्षणासाठी विज्ञान विषयात बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सामान्य कर्तव्य सहाय्यक, जीडीए अॅडव्हान्स, होम हेल्थ एड प्रशिक्षणाकरिता दहावी उत्तीर्ण तर वैद्यकीय उपकरणे तंत्रज्ञान सहाय्यक प्रशिक्षणाकरीता दहावी उत्तीर्ण तसेच इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर्स किंवा इतर कोणत्याही संबंधित विषयात डिप्लोमा असणे आवश्यक असून तीन वर्ष कार्य केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
या ठिकाणी करा नोंदणी:
प्रशिक्षणास पात्र उमेदवारांनी https://forms.gle/9RxTAeEHzJfDAnEh7 या गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करावी.
येथे साधा संपर्क :
अधिक माहितीसाठी 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, पहिला माळा हॉल क्रमांक 5/6, चंद्रपूर कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा.