Breaking News

क्राईम

महिला आमदारावर हल्ला

काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात हल्ला करण्यात आला आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “आज माझ्यावर अतिशय निर्घृण असा हल्ला झाला. कळमनुरी येथील कसबे धवंडा येथे हा हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला. मला गंभीर इजा पोहोचवण्याचा या हल्ल्याचा …

Read More »

दिग्गज क्रिकेटरची पत्नीला बॅटने मारहाण

भारतीय क्रिकेटचा माजी खेळाडू विनोद कांबळी अडचणीत सापडला आहे. त्याच्या पत्नीने शुक्रवारी त्याच्याविरोधात मद्यधुंद स्थितीत मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कांबळीविरोधात भादंवि कलम 324 व 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डोक्याला दुखापत विनोद कांबळीने आपल्याला स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल फेकून तिच्या डोक्याला दुखापत केल्याचा आरोप अँड्रिया कांबळीने केला आहे. त्याचवेळी हे प्रकरण सोडवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला …

Read More »

गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर गायींची अवैध विक्री : शिंदे लक्ष देणार काय?विखे पाटील ‘महसूल’मध्ये रमले

✍️मोहन कारेमोरे : संपादक✍️ गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील पेंढरी रस्ता आणि छत्तीसगडच्या सीमेवरील बठेहार या गावातून गायींची बेकायदेशीर खरेदी-विक्री केली जात आहे. याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लक्ष देतील काय, असा प्रश्न आहे. विखे पाटील यांच्याकडे महसूल खात्याचा पदभार आहे. तर, पशुसंवर्धन खात्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आहे. मात्र, महसूल कडे अधिक लक्ष तर पशुसंवर्धनकडे दुर्लक्ष …

Read More »

शिवसेनेच्या दिग्गज नेत्याचा अपघात

शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी आरोग्‍य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला अपघात झाला. शुक्रवार,सकाळी 11.40 वाजता मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काशी मिरा परिसरातील सगणाई नाका येथे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला डंपरने मागच्या बाजूने धडक दिली. सावंत हे या अपघातात जखमी झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यानंतर सावंत हे स्वतः रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल …

Read More »

नागपुरच्या जिल्हा न्यायालयात पोलिसाने फोडले वकिलाचे तोंड

नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात अनेक विषयांवरून वाद होणे नवीन नाही. मात्र, बुधवारी अचानक एक पोलीस अधिकारी आणि वकिलामध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यात पोलीस अधिकाऱ्याकडून वकिलाला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा न्यायालय परिसरात वकिलांची मोठी गर्दी असते. पाेलीस अधिकारी आणि वकिलामध्ये काही कारणास्तव बाचाबाची झाली. संबंधित वकिल न्यायालयामध्ये प्रवेश करताना चुकीच्या दिशेने येत असल्याने पोलिसांनी त्यांना …

Read More »

लाचखोरीत ‘पोलीस’ नव्हे, ‘महसूल’च अव्वल, ‘पीडब्लूडी’चे 14 अधिकारी जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदा केलेल्या 723 कारवाईत सर्वाधिक 173 प्रकरणे एकट्या महसूल विभागाची आहे. त्यामुळे पोलीस विभागालाही महसूलने मागे टाकले आहे. यामध्ये वर्ग 3 च्या लोकसेवकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पोलिस विभागात लाच घेण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा समज आकडेवारीने फोल ठरविला आहे. लाचखोरीत पोलिस नव्हे, तर महसूल विभाग सध्या आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसते. त्याखालोखाल पोलिसांचा नंबर लागतो. …

Read More »

शेताच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

शेताच्या वाटणीवरून राग अनावर झाल्याने पुतण्याने काकाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२८) दुपारी चंद्रपूरमधील चिमुर येथील गांधीवार्डात घडली. प्रभाकर नागोसे (वय ६०) असे खून झालेल्या काकाचे नाव आहे. तर रूपेश पत्रु नागोसे असे आरोपी पुतण्याचे नाव आहे. घटना वाचा…👇 चिमुरमधील गांधी वार्डातील रहिवासी असलेले मृतक व आरोपी नात्याने चुलते-पुतने आहेत. मृतक प्रभारक नागोसे यांनी, आपल्या आई-वडीलांचा मरेपर्यंत सांभाळ केला. वडिलांच्या …

Read More »

धक्कादायक : खून करुन मुंडक्याचा केला फुटबाॅल

चंद्रपूर शहराजवळील दुर्गापूर येथेल महेश मेश्राम यांचा खून केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. दुर्गापूर मुख्य मार्गावर हा खून झाला. मेश्राम हा तो नुकताच कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापुरात येथे रात्री साडे नऊ ते साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. मेश्राम यांना आधी टाेळक्याने मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचे मुंडक धडावेगळे …

Read More »

भंडाऱ्यात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश : बनावट मृत्यू प्रमाणपत्र अन् गोशाळेतील जनावरांची विक्री

विश्व भारत ऑनलाईन : भंडाऱ्यात गो-तस्करीचे नवे रॅकेट समोर आले आहे. यात 4 पशुवैद्यकीय डॉक्टरांने दिलेल्या खोट्या मृत्यू प्रमाणपत्राच्या मदतीने गौशाला चालकाने तब्बल 89 जनावरांची कत्तलीसाठी परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आता या प्रकरणी पवनी पोलिसांत 4 पशुवैद्यकीय डॉक्टरांसह 17 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात 4 डॉक्टर आणि गोशाळेच्या अध्यक्ष सचिवासह 13 संचालकांच्या समावेश आहे. …

Read More »

बहिण आणि गायिकेनेच केली सिद्धू मूसेवालाची हत्या?एनआयएने घेतले ताब्यात

विश्व भारत ऑनलाईन : पंजाबी प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाने नवे वळण घेतलेय. यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सिद्धू मुसेवालांची मानलेली बहिण आणि प्रसिद्ध पंजाबी पार्श्वगायिका अफसाना खान हिला गँगस्टर-दहशतवादी सिंडिकेट प्रकरणात समन्स बजावले आहे. एनआयएने मंगळवारी दिल्लीत अफसानाची पाच तास चौकशी केल्याचे कळते.अफसाना खानच्या चौकशीने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. मुसेवालाची जवळची मैत्रिण असलेल्या अफसाना हिने दिल्लीतील एनआयए मुख्यालयात …

Read More »