विश्व भारत ऑनलाईन :
नागपूर जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा काँग्रेसने गड कायम राखला आहे. काँग्रेसच्या सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथील मुक्ता कोकरड़े नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष (मत प्राप्त 39) आणि काँग्रेसच्याच गोधणी येथील कुंदा राउत (मत प्राप्त 38)यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली. तर,भाजपच्या मदतीने उपाध्यक्ष पदासाठी उत्सुक असलेले काँग्रेसचे सदस्य नाना कंभाले यांना केवळ 15 मत मिळाली. त्यामुळे भाजपच्या नियोजनाला धक्का पोहचला आहे. आधी पंचायत समितीत भाजपची दयनीय अवस्था झालेली आहे. आता जिल्हा परिषदेतही ऑपेरेशन लोटसची जादू चालू शकलेली नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना धक्का बसला आहे.