Breaking News

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार : नागपुरातून कुणाला संधी ? दटके, मेघे, खोपडे, मते, फुकेपैकी कोण होणार मंत्री?

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

नागपूर शहर आणि जिल्ह्यांत 2014 मध्ये भाजपचे 11 आमदार निवडून आले होते. पाच वर्षांनंतर फक्त पाच आमदार निवडून आले. आता नागपुरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा नव्याने सुरू झालीय.

Advertisements

✳️यात नागपूरमधून शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांना लाॅटरी लागू शकते, अशी शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रीपद द्यायचे नसल्याने प्रदेशाध्यक्ष पद दिले. सध्या उपमुख्यमंत्री फडणवीस हेच पालकमंत्री आहेत. आणि तेच राहतील.

✳️दक्षिण-पश्चिमचे आमदार देवेंद्र फडणवीस हे सध्या उपमुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि विधानपरिषद सदस्य आमदार प्रवीण दटके, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, हिंगण्याचे आमदार समीर मेघे व मौदा-कामठीचे टेकचंद सावरकर आहेत.

✳️प्रवीण दटके व समीर मेघे हे फडणवीस आणि गडकरी या दोघांशीही सख्य राखून आहेत. कृष्णा खोपडे यांची ही चौथी वेळ आहे. परंतु दरवेळी त्यांची गाडी ऐन वेळेवर सुटते. मोहन मतेंची लागभाग दिवाळी आहे. राज्यमंत्री म्हणून नंबर लागलाच तर दोघांची शक्यता अधिक असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

✳️2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यांना उर्जामंत्री करण्यात आले होते. 2019 मध्ये नितीन गडकरी आणि स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी लाख प्रयत्न करूनही त्यांना तिकीट देण्यात आले नाही. त्यांच्या जागी टेकचंद सावरकर निवडून आले. नंतर मात्र भाजपच्या सत्तेला हादरे बसले. पदवीधर मतदारसंघात संदीप जोशी यांचा पराभव करीत काँग्रेसचे अभिजित वंजारी निवडून आले.

✳️शिक्षक मतदारसंघात नागोराव गाणार तिसऱ्यांदा निवडून आले. आता चवथ्यांदाही त्यांचीच उमेदवारी पुढे करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी भंडारा-गोंदिया विधान परिषदेच्या संघात नागपूरच्या परिणय फुके यांना पाठविले होते.

✳️अतिशय अवघड वाटणारी निवडणूक त्यांनी जिंकली. त्यांनी या मतदारसंघावर माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे असलेले निर्विवाद वर्चस्व मोडून काढले. त्यांचेही प्रयत्न सुरु असल्याचे कळते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पुणे और नासिक से कौन होगा उम्मीदवार? महायुति में सुलझा सीट शेयरिंग का झगड़ा!

पुणे और नासिक से कौन होगा उम्मीदवार? महायुति में सुलझा सीट शेयरिंग का झगड़ा! टेकचंद्र …

नागपूर लोकसभा निवडणुकीतील मतदान कमी झाल्याचा मुद्दा नागपूर हायकोर्टात!

नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी पाच लाखांच्या अंतराने जिंकून येतील, असा दावा भाजपतर्फे केला जात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *