Breaking News

‘पीडब्लूडी’मध्ये चार काेटींचा घाेटाळा ; कारवाई थंडबस्त्यात

रत्नागिरीच्या चिपळूण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या(पीडब्लूडी)लेखा विभागातील दोघांनी ४ कोटी ८ लाखाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. मात्र, यात अनेकांना अभय देण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर संशयाची सुई आहे.

प्रकरण काय आहे?

ठेकेदारांनी ठेवलेली अनामत रक्कम परस्पर ऑनलाईन पद्धतीने बोगस ठेकेदाराच्या नावाने वळवले आहे. या प्रकरणी एका महिलेसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.

याबाबतची फिर्याद चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजीत रामसे यांनी दिली होती. गेले काही दिवस पोलिसामार्फत यविषयीची चौकशी सुरू होती. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात लिपीक म्हणून कार्यरत असलेले जीवन मारूती खंडझोडे व प्रतिक प्रमोद भिंगार्डे यांनी काही मित्र व नातेवाईकांच्या बँक खात्यात ऑनलाईन रक्कम वर्ग केली. त्यानंतर पुन्हा एक-दोन दिवसातच या दोघांनीही ही रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळवली.

तब्बल दोन वर्षे हा प्रकार टप्प्या-टप्प्याने सुरू होता. याविषयी खात्री पटताच पोलिसांनी संबंधीतांना ताब्यात घेत अटक केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का, यादृष्टीने पोलिस तपास सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी व पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी मोठ्या शिताफीने हा प्रकार उघडकीस आणला. तितक्याच तातडीने त्यांनी संशयीत आरोपींच्या मुसक्याही आवळल्या आहेत.

About विश्व भारत

Check Also

बदल्यांसाठी किती पैसे दिले? मंत्री काय म्हणाले?

राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये बदल्यांसाठी गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे सर्वत्र खळबळ …

तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या ‘पीडब्लूडी’ अधिकाऱ्याला अटक

लग्नाचे आमिष दाखवत ३० वर्षीय तरुणीचे मागील ७ वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील(पीडब्लूडी)अधिकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *