Breaking News
Oplus_131072

तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या ‘पीडब्लूडी’ अधिकाऱ्याला अटक

लग्नाचे आमिष दाखवत ३० वर्षीय तरुणीचे मागील ७ वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील(पीडब्लूडी)अधिकारी योगेश पाटील या तरुणाला पोलिसांनी तरुणीच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करत अटक केली आहे. तो अलिबाग येथे कार्यरत आहे.

 

योगेश पाटील याने सात वर्षे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर तरुणीची योगेश पाटील याच्याशी मैत्री झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटले होते. योगेश पाटील याने तिला त्याच्या रूमवरही भेटायला बोलावलं होतं. तेव्हा तरुणीला त्याने लग्न करू असं सांगितलं आणि शरीरसंबंध ठेवले. यानंतर त्याने अनेकदा लग्न करायचं असल्याचं सांगत त्याने शरिरसंबंधाची मागणी केली. पण चार वर्षांनंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि शेवटी लग्नाचा विषय योगेश पाटील टाळू लागला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केलीय.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडीत तरुणीची आणि योगेश पाटील याची सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाले आणि भेटू लागले. योगेश पाटील याने तरुणीला प्रपोज केलं आणि लग्न करायचं असल्याचं सांगितलं. मुलीने याबाबत आईबाबांशी बोलून लग्न करायचं असल्याचंही घरी सांगितलं. दरम्यान, २०१८ मध्ये योगेश याने तरुणीला घरी बोलावून शरीरसंबंधाची मागणी केली. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यासोबतच लग्न करेन असं तो तिला म्हणाला. यानंतर योगेशने वाशी इथं एका लॉजवर तिच्याशी शरिरसंबंध ठेवले.

 

योगेश हा पीडित तरुणीला महिन्यातून तीन ते चार वेळा भेटायला बोलवत असेल. भेटल्यावर त्यांच्यात शरिरसंबंध व्हायचे. त्यावेळी तरुणी लग्नाबाबत विचारायची. मात्र योगेश तिला घरी बोलतो असं म्हणून टाळायचा. कोरोनाच्या काळात पीडितेच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर योगेशच्या घरी जाऊन तरुणीने प्रेमसंबंधाची माहिती दिली. तेव्हा योगेशची आई काहीच बोलली नाही. पुन्हा २०२१ मध्येही पीडित तरुणीने लग्नाबाबत योगेशच्या आईकडे विचारणा केली. तेव्हा आईने तरुणीला योगेश तुझ्याशी लग्न करण्यास तयार नसल्याचं सांगितलं. तेव्हा तरुणीला धक्का बसला आणि तने आत्महत्येचाही प्रयत्न केला. योगेशसोबत तिने बोलणंही बंद केलं होतं.

 

दरम्यान, योगेश लग्नाबाबत खोटं बोलत असल्यानं त्याच्याशी बोलणं बंद केल्याचं तरुणीने म्हटलंय. त्याच्या वाढदिवशी तरुणीने त्याला शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला. तेव्हापासून दोघांमध्ये व्यवस्थित बोलणं होतं होतं. पण पुन्हा लग्नाबाबत विचारताच योगेशने वाद घातला आणि पीडितेचा नंबर ब्लॉक केला. तरुणी क्लासला गेली असताना तिथे जाऊन योगेशने वाद घालत तिला मारहाण केली. यानंतर तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली. लग्न करू असं वचन देत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडित तरुणीने योगेश पाटील याच्यावर केला आहे.

About विश्व भारत

Check Also

२४ उपजिल्हाधिकाऱ्यांना नियमबाह्य बढती : मुख्य सचिवांकडे तक्रार

२४ उपजिल्हाधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत बढती देण्याचा प्रस्ताव दाखल करताना नियम डावलले असल्याची तक्रार महाराष्ट्र …

गर्म पानी में झुलसने से मासूम की मौत : परिजन सदमे में

गर्म पानी में झुलसने से मासूम की मौत, परिजन सदमे में टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *