Breaking News

राज्यातून कोरोना हद्दपार, सण-उत्सव धुमधडाक्यात साजरा करा : आरोग्यमंत्री सावंत

Advertisements

चीनमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा डोकेदुखी ठरत आहे.यामुळे भारतासह महाराष्ट्रातही चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? याचीही चर्चा सुरू आहे. याबाबत शनिवारी, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

Advertisements

महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार झाला आहे. आगामी सण, उत्सव, ख्रीसमस आणि नवीन वर्ष धुमधडाक्यात साजरे करा असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले.

Advertisements

आमदार जयकुमार गोरे यांची विचारपूस करण्यासाठी मंत्री तानाजी सावंत रुबी हॉस्पिटलमध्ये आले होते. ते म्हणाले, आमदार गोरे यांची प्रकृती उत्तम आहे, घाबरण्याचे काही कारण नाही. ते माझ्याशी देखील बोलले, आणि हसत हसत बोलले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम ठणठणीत उत्तम असल्याचे मंत्री सावंत म्हणाले

Advertisements

About विश्व भारत

Check Also

तुम्ही वर्तमानपत्रात वडापाव, समोसा,भजी गुंडाळून खाता काय? सावधान

मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडून खाद्यपदार्थ देण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केला जात होता. ही बाब निदर्शनात …

भात आणि पोळीने खरंच डायबिटिज वाढते का?

भात आणि पोळीने खरंच डायबिटिज वाढते का? मधुमेहाचा (डायबिटीज) त्रास असलेले अनेक लोक भात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *