औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात अंदाजे 900 जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 900 जणांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांनी औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घ्यायला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेरचा लग्नसोहळा बुधवारी 4 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुलीकडच्यांनी आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी ठेवली होती. मात्र यावेळी लग्नात बनवण्यात आलेल्या स्वयंपाकातून लोकांना विषबाधा झाली आणि एकच खळबळ उडाली.
विश्वभारत News Website