Breaking News

पुण्यात चिकन, मटणचे मोफत सूप दिल्याने हॉटेल चालकावर कोयत्याने वार

Advertisements

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एका हॉटेल चालकाने चिकन,मटणाचा फुकट सूप देण्याचे सुरू केले होते. ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्याने एका हॉटेल चालकावर कोयत्याने वार करुन बेदम मारहाण करण्यात आली.ही घटना पुण्यातील खडकी भागात घडली.

Advertisements

या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक स्पर्धेतून उपहारगृहाचालकावर हल्ला करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.मुलायम रामकृपाल पाल (वय 27, रा.दुर्गा माता मंदिराजवळ, मिलिटरी डेअरी फार्म, खडकी) असे जखमी झालेल्या उपहारगृहचालकाचे नाव आहे. या प्रकरणी सिद्धार्थ भालेराव, दिग्विजय गजरे (दोघे रा. खडकी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाल यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाल यांचे खडकी बाजार परिसरातील चौपाटीजवळ ‘ओ शेठ’ हाॅटेल आहे. त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फुकट सूप योजना सुरू केली. खडकीतील चौपाटी परिसरात आरोपी भालेराव आणि गजरे खाद्यपदार्थ विक्रीची गाडी लावतात. पाल यांनी ग्राहकांना फुकट सूप देण्यास सुरुवात केल्यानंतर प्रतिसाद वाढला.ग्राहकांच्या प्रतिसाद वाढल्याने पाल यांच्यावर आरोपी चिडून होते. वादातून आरोपी भालेराव आणि गजरे यांनी पाल यांच्यावर कोयत्याने वार करुन बेदम मारहाण केली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर …

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *