Breaking News

खवले मांजराची विक्री, आरोपी अटकेत : नागपूर-भंडारा वनविभागाची कारवाई

Advertisements

नागपूर व भंडारा वनविभागाच्या संयुक्त पथकाने खवले मांजर या अत्यंत दुर्मिळ वन्यप्राण्याची विक्री करताना दोघांना अटक केली. रामेश्वर माणिक मेश्राम (रा. तिड्डी, जि. भंडारा, वय 32), सचिन श्रावण उके (रा. खमारी (भोसा), जि. भंडारा, वय २९) अशी आरोपीची नावे आहेत. आरोपींकडून 19.915 कि.ग्रॅ. वजनाचे जिवंत नर खवले मांजर जप्त करण्यात आले.

Advertisements

खवल्या मांजराची विक्री केली जात आहे, अशी माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर बनावट ग्राहक पाठवून सौदा केला. सौदा पक्का झाल्या नंतर वनाधिकाऱ्यांनी आरोपींना अटक केली.

Advertisements

खवले मांजर, म्हणजेच खवल्या किंवा पँगोलिन हा दुर्मिळ प्राणी नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. खूप पूर्वी स्थानिक लोक आणि आदिवासी जंगली प्राण्यांची शिकार करून खायचे, पण पुढे त्यांना इतर पर्याय उपलब्ध झाल्याने आणि वन्यजीव संरक्षणाचा कायदा आल्याने यावर निर्बंध आले. गेल्या काही वर्षांमध्ये तस्करीच्या उद्देशाने भारतात खवल्या मांजराची शिकार वाढल्याचं दिसत आहे.

ओडिशामध्येही या तस्करीत वाढ झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारात चिनी पँगोलिनची संख्या घटल्याने तस्करीचा मोर्चा भारतीय पँगोलिनकडे वळला असून खवले मांजरांची बिळे शोधून त्यांना बाहेर काढले जाते. आणि त्याची खवले काढण्यासाठी उकळत्या पाण्यात टाकले जाते. हे काम करणारे रीतसर एक रॅकेट असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, 15 फेब्रुवारीला जगभरात आंतरराष्ट्रीय पँगोलिन दिन साजरा होतो. कारवाई नागपूर वनविभागाचे विभागीय वनाधिकारी ( दक्षता) प्रितमसिंह कोडापे यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे, विवेक राजूरकर, आय. एम. सैय्यद, क्षेत्र सहायक एन. डी. तवले, वनरक्षक संदीप धुर्वे, दिनेश शेंडे, योगेश ताळाम, दिनेश पवार, ए. एन. नरडंगे, एन. जी. श्रीरामे, एस. एस. कुकडे आदींनी केली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अरवली पर्वत वाचविण्याची धडपड!

✍️लेखक : *रमेश लांजेवार* (मुक्त पत्रकार ) 📱9921690779 अरवली पर्वतांचे खनन खूप जुन्या काळापासून सुरू …

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…!

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   सिवनी। पेंच टाइगर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *