Breaking News

नागपूरजवळ बसच्या चाकातून निघाली आग : चालक वाहकाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

Advertisements

शिवशाही बसच्या मागच्या चाकातून आगीच्या ठिणग्या अन् धूर निघत होता. हे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवित बस थांबवित प्रवाशांना पटापट बसच्या बाहेर काढले. फायर इंस्टिग्यूशरने आग विझविली. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. उपस्थित प्रवाशांनी चालक, वाहकाचे अभिनंदन केले. ही घटना रविवारी नागपूरपासून जवळच असलेल्या गोंडखैरी टोलनाक्या समोर घडली.

Advertisements

शिवशाही बस (एमएच ०६, बीडब्ल्यू-०२८९) अमरावती डेपोची आहे. चालक अमोल मोहरकार आणि वाहक लाईक खान यांच्यावर बसची जबाबदारी होती. ही बस नागपुरच्या गणेशपेठ डेपोतून अमरावतीसाठी निघाली. बसमध्ये आठ प्रवासी होते. वाडीमार्गे निघालेल्या बसने गोडखैरी टोल नाका ओलांडल्यावर मागच्या चाकातून आगीच्या ठिणग्या आणि धूर निघू लागला. वाऱ्याने धुर पसरत होता.

Advertisements

त्याच मार्गाने जाणाऱ्या एका दुचाकी चालकाने बसच्या मागच्या चाकातून धूर निघत असल्याचे बस चालक मोहरकार यांना सांगितले. मोहरकार यांनी लगेच बस थांबविली. तिकडे वाहकाने प्रवाशांना बाहेर काढले. फायर इंस्टिग्युशरचा वापर करत ठिणग्या अन् धुरावर नियंत्रण मिळविले. नंतर या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. काही वेळातच पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचले. चालकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी चालक आणि वाहकाचे अभिनंदन केले.

याविषयी नागपूर आगार व्यवस्थापक, अमरावती आगार व्यवस्थापक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. काही वेळातच घाटरोड डेपोतून तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दोन तासाच्या दुरूस्ती नंतर शिवशाही बसला घाटरोड डेपोत आणण्यात आले. तत्पूर्वी आठही प्रवाशांची व्यवस्था मागून येणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये करण्यात आली. घटनास्थळी आगार व्यवस्थापक धारगावे आणि घाटरोड डेपोचे एटीएस धुंडापे उपस्थित होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद : शहरातील कोणता भाग प्रभावित होणार? वाचा

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद   कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा खंडित   नागपूरकरांसाठी एक …

BHEL को मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश

BHELको मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *