Breaking News

नागपुरात गोळीबार : दोघांना अटक

Advertisements

नागपुरातील मोमीनपुरा परिसरात दुचाकीला कारची धडक लागल्याच्या क्षुल्लक वादावरून एकाने मध्यरात्री पिस्तुलातून हवेत गोळी झाडली. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. रवी लांजेवार (वय ३८, रा. उमरेड रोड) आणि आनंद ठाकूर (वय ३५, रा.मानेवाडा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर प्रणय आणि समीर हे दोघे फरार आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Advertisements

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोमीनपुरा परिसरात एका चहा टपरीवर रवी लांजेवार आणि आनंद ठाकूर यांच्यासह चौघे जण कारने आले. दरम्यान, त्यांच्या कारने शहाबुद्दीन रियाजुद्दीन उर्फ पापा याच्या दुचाकीला धडक दिली. त्यातून शहाबुद्दीन यांनी चालक आनंद ठाकूर याला मारहाण केली. यावेळी बघ्यांची गर्दी जमल्याने आरोपी पसार झाले. यानंतर चार आरोपींनी नंदनवन येथील एका बारमध्ये दारू पिली. व ते पुन्हा मोमीनपुरात परतले. दारुच्या नशेत एकाने एक गोळी हवेत तर दुसरी पानठेला चालक रईस अख्तरच्या दिशेने चालवली. मात्र, अति दारू सेवनाने नेम चुकल्याने रईस सुदैवाने बचावला. हे बघताच, सारे बाहेर आले. संधी साधून चौघेही कारमध्ये बसून पसार झाले. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रवी लांजेवार आणि आनंद ठाकूर या दोघांना अटक केली. समीर आणि प्रणय हे दोघेही अद्याप फरार आहेत.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अशोक खरात करायचा योनी पूजा : महिलांना द्यायचा मूत्र आणि वायग्रा

भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक काळे कारनामे दिवसेंदिवस समोर येत आहेत. ज्योतिषी सांगण्याच्या नावाखाली त्याने …

तीन IAS अधिकाऱ्यांनी घेतली भोंदू अशोक खरातची भेट : उपजिल्हाधिकारी गोत्यात

तीन IAS अधिकाऱ्यांनी घेतली भोंदू अशोक खरातची भेट भोंदू अशोक खरातच्या अटकेच्या अवघ्या तीन दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *