Breaking News

महागद्दार म्हणजे उद्धव ठाकरे, करंटा आणि महाकलंक व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे!

Advertisements

“२०१९ चा महागद्दार म्हणजे उद्धव ठाकरे, महाराष्ट्राच्या राजकारणातला करंटा आणि महाकलंक व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे… अशा व्यक्तीला धडा शिकवणारा महानायक म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,” अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

Advertisements

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘नागपूरला लागलेला कलंक’ असा केला होता. याच ‘कलंक’ शब्दावरून केलेल्या टीकेला बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘महाकलंक’ असा केला आहे.

Advertisements

“भाजपा विधानसभेच्या १५२ हून अधिक जागा जिंकेल”

चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभेचा विजयी संकल्पही बोलून दाखवला. येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. तर विधानसभेत महायुतीला २०० हून अधिक जागांवर विजय मिळवायचा आहे. यातील १५२ हून अधिक जागा भाजपा जिंकेल, असा संकल्प केल्याची माहिती बावनकुळेंनी यावेळी दिली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *