Breaking News

कर्मचाऱ्यांना सोमवारपासून हेल्मेटसक्ती? अन्यथा दंड

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात मोटारसायकल-स्वारांना अडवून हेल्मेटबाबत विचारणा करण्यात आली. या निमित्ताने कागदपत्रांची व लायसन्सची तपासणीही शुक्रवारी करण्यात आली. लायसन्स नसणार्‍यांकडून दंड वसूल करण्यात आला.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सकाळीच प्रादेशिक परिवहनचे पथक दाखल झाले. जिल्हा परिषदेत आरटीओ पथक का आले आहे हेच समजत नव्हते. त्यांनी प्रवेशद्वाराचा ताबा घेत येणार्‍या प्रत्येक दुचाकी वाहनधारकांकडे हेल्मेटबाबत विचारणा केली. बहुतांशी कर्मचारी हेल्मेटविनाच येतात. पथकातील कर्मचार्‍यांनी या कर्मचार्‍यांकडे गाडीची कागदपत्रे, लायसन्स याची विचारणा करण्यात येऊ लागली. यामध्ये काही कर्मचार्‍यांकडे लायसन्सही नसल्याचे आढळून आले. या पथकाने सर्व कर्मचार्‍यांना सोमवारपासून हेल्मेट घालून येण्यास सांगितले.

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …

१२ भाविकांचा मृत्यू : मौनी अमावस्येला महाकुंभात चेंगराचेंगरी : शाही स्नान रद्द

महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *