Breaking News

विदर्भात बुधवारपासून पावसाला सुरुवात : पुढील ४८ तासांत संपूर्ण राज्य व्यापणार

Advertisements

बुधवार पासून राज्यात मान्सून सक्रीय होत आहे. सुरुवात तो विदर्भात येईल त्यानंतर ४८ तासांत संपूर्ण राज्यात त्याचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात माेठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तीव्र झाल्याने जम्मू कश्मीर पासून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश पर्यंत पावसाला सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने ही दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे.

Advertisements

बंगालच्या उपसागरापासून आंध्र प्रदेश किनार पट्टी पर्यंत द्रोणीका रेषा तयार झाली आहे. त्यामुळे हा पाऊस महाराष्ट्रात वाढणार आहे. बुधवार दि.१३ पासून विदर्भात हलका ते मध्यम पावसाला सुरुवात हाेईल. गुरुवारपासून विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल. शुक्रवारपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यानंतर पुन्हा १७ ते १९ आणि पुढे १९ ते २३ सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याच कालावधीत गणपतीचे आगमन आहे.

Advertisements

या भागात राहणार जोर
विदर्भ : १३ पासून सुरुवात,१४ ते १७ मुसळधार
मध्य महाराष्ट्र : १५ पासून सुरुवात
कोकण : १५ पासून सुरुवात
घाट माथा : १६ व १७ रोजी; पुणे, नाशिक, सातारा (मुसळधार)
मराठवाडा : १६ पासून सुरुवात

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *