Breaking News

नागपुरातील ओबीसी आंदोलनाला विविध संघटनांचा वाढता पाठिंबा

Advertisements

नागपुरात मागील १८ दिवसांपासून ओबीसींच्या हक्कासाठी संविधान चौकात साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला राज्यभरातून विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. यावेळी सर्वश्री गणेश नाखले, महेंद्र उईके, गेमराज गोमासे, शरद वानखेडे, दौलत शास्त्री, माया घोरपडे, पल्लवी मेश्राम,केशव शास्त्री, त्रिलोकचंद व्यवहारे, परमेश्वर राऊत, प्रा. रमेश पिसे, कल्पना मानकर, सुधाकर तायवाडे, उदय देशमुख, हेमंत गावंडे, डॉ अरुण वराडे, अविनाश घागरे हे आज उपोषणाला बसले आहेत.आज धुळे नगर पालिकेचे प्रथम महापौर भगवानजी करंकाळ,नांदुरा येथील ओबीसी महासघांचे, उपाध्यक्ष विजय डवंगे, सुरज बेलसरे, अमरावती येथील राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे, प्रकाश साबळे, शहराध्यक्ष अनिल ठाकरे साहेब,राहुल तायडे, यांनी पाठिंबा जाहीर केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख, चंद्रशेखर पांडे,प्रवीण जोध,अजीज पटेल अमरावती,राजेश ठाकरे, अरुण वराडे, पांडुरंग कापसे,आणि स्थानिक स्तरावर आंदोलन करण्याचे मनसुबे व्यक्त केले.राष्ट्रीय ओबीसी महासंघाला ऑर्गनायझेशन फॉर राईटस ऑफ ट्रायबल (ऑफ्रोट) संघटनेच्या जाहीर पाठिंबा आज देण्यात आला.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *