राज्यातील राजकारणात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. त्यातच आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या विधानामुळेही राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. एकीकडे अपात्र आमदारांचा विषयाने गती घेतलेली असतानाच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. मंत्री दीपक केसरकर कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी सांगितले की, जेव्हा या विभागाचा पदभार स्वीकारला तेव्हा तुम्हाला आम्ही वर्षाला 25 कोटी रुपये देतो असे सांगत काही एजंट माझ्याजवळ आले होते असा खळबळ जनक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
एजंटबरोबर डिलिंग
दीपक केसरकर यांनी एजंटांच्या 25 कोटीचे वक्तव्य केले असले तरी त्याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारचेच एजंट मंत्रालयाजवळ फिरत असल्याचा आरोप केला होता. त्या कंत्राटदार आणि एजंटबरोबर डिलिंग होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. दलालीसाठी शिंदे सरकार काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. त्यांच्या या आरोपालाच त्यांनी हे अशा प्रकारचे खरमरीत उत्तर दिले आहे.
विश्वभारत News Website