Breaking News

नागपुरात ठाकरे गटाला धक्का, आयकर विभागाची छापेमारी : काँग्रेस आमदार अडचणीत

Advertisements

ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याच्या निकटवर्तीयाच्या नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सूत गिरणीवर आयकर विभागाने धाड मारली आहे. नागपुरात आयकर विभागाकडून ही कारवाई सुरू आहे. काल सकाळपासून सुरू झालेली ही छापेमारी अजूनही सुरू आहे. तर, दुसरीकडे धुळ्याचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या सूत गिरणीवरही छापेमारी करण्यात आली आहे. कुणाल पाटील यांच्या सूत गिरणीवर कोणत्या विभागाने छापेमारी केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, काँग्रेसने आमदार कुणाल‎ पाटील यांच्यावर नुकतीच अमरावती, नागपूर ‎लोकसभेची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर लगेच त्यांच्या कारखान्यावर छापेमारी झाल्याने या कारवाईचे आता राजकीय अर्थही काढले जात आहेत.

Advertisements

ठाकरे गटाचा नेता लक्ष्य

Advertisements

नागपुरात तुकाराम ऊर्फ बंडू किसन तागडे यांच्या मातोश्री मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूत गिरणीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाने काल सकाळी 8 वाजता ही धाड टाकली. आजही छापेमारी सुरू आहे. गेल्या 24 तासांपासून आयकर विभागाचे अधिकारी कागदपत्रांची छाननी करत आहेत. नागपुरातील नरखेड तालुक्यातील मालापूर (सावरगाव) येथे ही सूत गिरणी आहे. तागडे हे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या कारवाईत पुढे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या कारवाईवर अद्याप तुकाराम तागडे किंवा विनायक राऊत कुणाचीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

लोकसभेची जबाबदारी सोपवताच कारवाई

काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यावर विदर्भातील लोकसभेची जबाबदारी सोपवताच त्यांच्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर शनिवारी छापा टाकण्यात आला. धुळे ग्रामीण मतदारसंघातून सलग दुसऱ्या‎ वेळी विजयी झालेले आमदार कुणाल‎ पाटील यांच्यावर अमरावती, नागपूर ‎लोकसभेची जबाबदारी सोपवण्यात आली‎ आहे. त्यांचे वर्चस्व असलेल्या जवाहर ‎शेतकरी सहकारी सूत गिरणीवर शनिवारी‎ अचानक छापा टाकण्यात आला. सुमारे‎ पाच कारमधून सकाळी हे पथक पुणे व ‎नाशिक येथून आले होते. ही छापेमारी अजूनही सुरू आहे. पथकाने येताच सूतगिरणीतील सुरक्षा रक्षकांचे मोबाइलसह दूरध्वनी कट करत गोदामाच्या चाव्या जप्त केल्या.

माजी कर्मचाऱ्यांनीच केली तक्रार?

दरम्यान, जवाहरनगर शेतकरी सहकारी सूत गिरमीच्या काही माजी कर्मचारी यांनी‎ कारखान्यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार दिली होती.‎ या तक्रारीनंतर ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. ‎ गुजरातमधील एका कंपनीला सूतगिरणीने‎ कामाचा ठेका दिला आहे. संबंधित‎ कंपनीच्या चुकीमुळे हकनाक सूतगिरणीला‎ चौकशीला सामोरे जावे लागले. तसेच‎ जीएसटी विभागाने त्रुटी काढून ही कारवाई‎ केली, अशीही चर्चा रंगली आहे. मात्र, अद्याप तरी कारवाई नेमकी कशा संदर्भात केली, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

नियमांचे पूर्ण पालन…

सूतगिरणीचे ऑडिट व तपासणी यापूर्वीच झाली आहे. नियमांचे पालन करत कामकाज सुरू आहे. कारवाई नेमकी कोणत्या विभागाने केली हे सांगता येणार नाही.

– कुणाल पाटील, आमदार

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *