Breaking News

बरं झालं!भ्रष्ट छगन भुजबळांची पालकमंत्री पदावर नियुक्ती केली नाही

Advertisements

पालकमंत्री पद कधी जाहीर होणार, याकडे डोळे लावून बसलेल्या दिग्गज राजकीय मंडळीची अखेर इच्छापूर्ती झाली आहे. काल पालकमंत्री नेमले गेले.पालकमंत्रीपदाच्या वाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनासारखे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले असले तरी छगन भुजबळ व सुनील तटकरे यांची इच्छापूर्ती मात्र झालेली नाही. राष्ट्रवादीच्या नऊपैकी सात मंत्र्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची मागणी मान्य झाली. याशिवाय राष्ट्रवादीसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कोल्हापूरचे पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांना मिळाले आहे.

Advertisements

राष्ट्रवादीला पुणे, कोल्हापूर, बीड, गोंदिया, परभणी या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर या दोन जागा अजित पवार गटाच्या वाट्याला येण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांच्याकडून काढून हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्यात आले. हा शिंदे गटाला मोठा धक्का समजला जातो. कारण कोल्हापूरचे खासदारपद शिंदे गटाकडे आहे. हसन मुश्रीफ पालकमंत्री झाल्याने जिल्ह्यातील निधी वाटपावर त्यांचे वर्चस्व राहणार आहे. बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे आल्याने पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. सत्तेच्या माध्यमातून धनंजय मुंडे हे पंकजा समर्थकांना आपल्याकडे ‌वळविण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *